Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजारात पुन्हा घसरण, Sensex १९७ अंकांची, तर निफ्टीमध्ये ५९ अंकांची घसरण; हे स्टॉक्स आपटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 10:22 IST

Share Market Investment: जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी देशांतर्गत शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात घसरण नोंदवण्यात आली आहे.

Share Market Investment: जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी देशांतर्गत शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात घसरण नोंदवण्यात आली आहे. सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी बीएसई (BSE) सेन्सेक्स १९६.७३ अंकांच्या घसरणीसह ८४,८६६.७३ च्या पातळीवर व्यवहार करत होता. त्याच वेळी, एनएसई (NSE) निफ्टी ५९.०५ अंकांच्या घसरणीसह २६,११९.६५ वर व्यवहार करताना दिसला. मागील ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स ८५,०६३.३४ वर आणि निफ्टी ५० हा २६,१७८.७० वर बंद झाला होता. सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी पॅकमधील १,२८६ शेअर्स ग्रीन झोनमध्ये, तर १,०१९ शेअर्स रेड झोनमध्ये व्यवहार करत होते. ११३ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही.

बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समधील स्थिती

ब्रॉडर इंडेक्समध्येही सुरुवातीच्या सत्रात घसरण पाहायला मिळाली. सुरुवातीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई मिडकॅप १३.७४ अंकांनी घसरला, तर बीएसई स्मॉलकॅप इंडेक्स १८.६६ अंकांनी वधारून ५१,७३४.६२ वर व्यवहार करत होता. ७ जानेवारी रोजी टायटन कंपनी, जुबिलेंट फूडवर्क्स, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स, लोढा डेव्हलपर्स, येस बँक, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट, इंडियन एनर्जी एक्सचेंज, बायोकॉन आणि ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन यांसारख्या शेअर्सवर गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष आहे.

रुपया डॉलरच्या तुलनेत २६ पैशांनी मजबूत

कमकुवत डॉलर आणि जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या मोठ्या घसरणीमुळे बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत २६ पैशांनी वधारून ८९.९२ वर पोहोचला. इंटरबँक फॉरेन एक्सचेंजमध्ये रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९०.२० वर उघडला, परंतु त्यानंतर तो वाढत गेला आणि मागील बंद भावापेक्षा २६ पैशांनी वधारून ८९.९२ वर व्यवहार करत होता. मंगळवारी रुपयानं सलग चार दिवसांची घसरण थांबवत अमेरिकन चलनासमोर १२ पैशांच्या वाढीसह ९०.१८ वर बंद झाला होता.

आशियाई बाजारातील आजचा कल

आज आशियाई शेअर बाजारात हलका दबाव दिसून आला. जपानचा निक्केई २२५ (Nikkei 225) ३४६.०८ अंक किंवा ०.६६% घसरून ५२,१७२ वर बंद झाला. त्याच वेळी, हाँगकाँगचा हँग सेंग २४८.४५ अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. मात्र, दक्षिण कोरियाचा कोस्पी सकारात्मक क्षेत्रात राहिला आणि त्यानं ४८.६९ अंकांची वाढ नोंदवली. त्याचप्रमाणे, शांघायचा एसएसई (SSE) कंपोझिट इंडेक्स देखील ११.८७ अंक किंवा ०.२९% च्या वाढीसह बंद झाला. जिथे काही प्रमुख बाजारांनी कमकुवत कामगिरी केली, तर काहींनी हलकी वाढ नोंदवली.

English
हिंदी सारांश
Web Title : Market Falls Again: Sensex Down, Nifty Dips; Stocks Take a Hit

Web Summary : Indian stock markets witnessed a decline amid global cues. Sensex fell 197 points, Nifty 59. Rupee strengthened against the dollar. Asian markets showed mixed trends.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक