Join us

Stock Market Crash Today : शेअर बाजारासाठी 'Black Monday'; सेन्सेक्स ३००० नं आपटला, निफ्टीमध्येही ११०० अंकांची घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 09:32 IST

Stock Market Crash: डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या घोषणेमुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. सलग तीन दिवस अमेरिकेच्या बाजारात मोठी घसरण झाली आणि अमेरिकेतील घसरणीचा फटका आशियाई बाजारांनादेखील बसला.

Stock Market Crash: डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफच्या घोषणेमुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. देशांतर्गत शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण पाहायला मिळत आहे. बाजारासाठी आजचा दिवस ब्लॅक मंडे ठरताना दिसतोय. कामकाजाच्या सुरुवातीला निफ्टी ११०० अंकांनी घसरून २१,८०० च्या पातळीवर आला. तर सेन्सेक्स ३३०० अंकांच्या घसरणीसह ७१,९०० च्या आसपास होता. बँक निफ्टी तब्बल २००० अंकांनी घसरला. निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक ३४०० अंकांनी घसरून ४७,२४९ वर आला. इंडिया व्हीआयएक्स ५६ टक्क्यांनी वधारला आहे.

ट्रम्प टॅरिफमुळे सलग तीन दिवस अमेरिकेच्या बाजारात मोठी घसरण झाली आणि अमेरिकेतील घसरणीचा फटका आशियाई बाजारांनादेखील बसला. गिफ्ट निफ्टी ९०० अंकांनी घसरून २२,१०० अंकांवर तर निक्केई ६ टक्क्यांनी म्हणजेच २३०० अंकांनी घसरून बंद झाला. वास्तविक, जोरदार विक्रीमुळे अमेरिकन बाजारात खळबळ उडाली होती. शुक्रवारी बाजार ५ वर्षांतील सर्वात मोठी घसरण होत शेअर बाजार ६ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. डाऊ २२५० अंकांनी तर नॅसडॅक जवळपास १००० अंकांनी घसरला. 

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची आकडेवारी पाहिली तर एफआयआयनं सलग पाचव्या दिवशी कॅशमध्ये विक्री केली. शुक्रवारी कॅश, निर्देशांक आणि शेअर फ्युचर्स मिळून सुमारे ९५२५ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री झाली, तर देशांतर्गत फंडांनी १७२० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

बाजारासाठी आज महत्त्वाचे ट्रिगर

आशियासह जागतिक बाजारात मोठी घसरणडाऊ २२३१, नॅसडॅक ९६२ अंकांनी घसरलाचीनने अमेरिकेवर लादलेल्या ३४ टक्के शुल्कामुळे व्यापार युद्धाचा धोकाक्रूड ६३ डॉलरच्या जवळ, सोनं ३००० डॉलर्सच्या खालीबेस मेटल्स आणि क्रिप्टोमध्ये मोठी घसरणयूएस बाँड यील्ड ७ महिन्यांच्या नीचांकी ३.९% च्या खालीव्याजदरावरून ट्रम्प-पॉवेल यांच्यातील शाब्दिक युद्ध तीव्रएफआयआयची निव्वळ विक्री ९५२५ कोटी

व्यापार युद्धामुळे अमेरिकेच्या फ्युचर्समध्ये आज घसरण झाली. डाऊ फ्युचर्स १२०० अंकांनी घसरला, तर नॅसडॅक फ्युचर्स ८०० अंकांनी घसरला. एस अँड पी फ्युचर्स ४ टक्क्यांनी घसरून ५००० च्या खाली आला. ट्रम्प यांच्या प्रत्युत्तरात्मक शुल्काला चीननंही प्रत्युत्तर दिलंय. १० एप्रिलपासून सर्व अमेरिकन उत्पादनांवर अतिरिक्त ३४% शुल्क जाहीर करण्यात आलं आहे. ट्रम्प यांनी चीननं हा निर्णय भीतीमुळे घेतल्याचं म्हटलंय. 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक