Join us
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी गुंतवणूकदारांची पाठ, अदानींना दणका आणि रुपयाचा नीचांक; 'या' ७ कारणांनी बाजार कोसळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 16:35 IST

Share Market Crash: शुक्रवारी, २३ जानेवारी रोजी भारतीय शेअर बाजारांमध्ये आणखी एक मोठी घसरण झाली. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरला, तर निफ्टी २५,०५० च्या खाली घसरला.

Share Market Crash : भारतीय शेअर बाजारासाठी चालू आठवडा अत्यंत वेदनादायी ठरला आहे. शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारात विक्रीचा प्रचंड दबाव पाहायला मिळाला, ज्यामुळे सेन्सेक्स ८०० अंकांपर्यंत खाली आला. निफ्टीनेही २५,०५० ची महत्त्वाची पातळी तोडल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. केवळ एका आठवड्यात सेन्सेक्सने सुमारे २००० अंकांची घसरण नोंदवली असून, बाजारातील ही 'त्सुनामी' रोखण्यात सर्वच स्तर अपयशी ठरल्याचे दिसत आहे.

बाजारातील पडझडीची ७ प्रमुख कारणे१. परदेशी गुंतवणूकदारांचे पलायन : जानेवारी महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत सुमारे ३६,००० कोटी रुपये बाजारातून काढून घेतले आहेत. सलग १३ व्या दिवशी एफआयआय निव्वळ विक्रेते राहिले आहेत.

२. कमजोर तिमाही निकालब्लूचिप कंपन्यांचे, विशेषतः आयसीआयसीआय बँक आणि एचसीएल टेकचे निकाल अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील विश्वासाला तडा गेला आहे.

३. रुपयाची ऐतिहासिक घसरणडॉलरच्या तुलनेत रुपया ४१ पैशांनी घसरून ९१.९९ या नव्या विक्रमी नीचांकी स्तरावर पोहोचला आहे. भांडवल बाहेर जाणे आणि डॉलरची मजबुती यामुळे रुपयाची दयनीय अवस्था झाली आहे.

४. अदानी समूहाचा 'धक्का'अमेरिकन नियामक संस्थेने गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्याविरोधात समन बजावण्यासाठी न्यायालयात धाव घेतल्याच्या वृत्तामुळे अदानींच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली, ज्याचा परिणाम संपूर्ण बाजारावर झाला.

५. कच्च्या तेलाचा भडकाब्रेंट क्रूडचा भाव ०.८ टक्क्यांनी वाढून ६४.५७ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. यामुळे आयात खर्च वाढण्याची आणि महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

६. भू-राजकीय अनिश्चितताट्रम्प यांचे अमेरिकन धोरण आणि युरोपसोबतचे तणावपूर्ण संबंध यामुळे जागतिक गुंतवणूकदार सावध आहेत. ग्रीनलँड कराराबाबतची अस्पष्टता आणि व्यापार युद्धाची शक्यता बाजारासाठी नकारात्मक ठरत आहे.

७. बँकिंग क्षेत्रात मोठी विक्रीबँक निफ्टी आज १ टक्क्याने घसरला. पीएनबी आणि येस बँक यांसारख्या शेअरमधील कमजोरीमुळे बँकिंग निर्देशांकावर मोठा दबाव निर्माण झाला.

वाचा - अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 'ब्लॅक फ्रायडे'! अमेरिकेतील बातमीने १२ टक्क्यांची मोठी पडझड

ब्रॉडर मार्केटमध्येही हाहाकारकेवळ मोठे शेअर्सच नाही, तर मिडकॅप इंडेक्स १.६७ टक्के आणि स्मॉलकॅप इंडेक्स २.३२ टक्क्यांनी कोसळले. निफ्टी आपल्या २०० दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली गेल्याने तांत्रिकदृष्ट्या बाजार आता 'बेअरिश' झोनमध्ये गेल्याचे संकेत मिळत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Market Crash: Foreign Investors Exit, Adani Hit, Rupee Plunges, Reasons

Web Summary : Indian markets crashed due to foreign investor exits, weak earnings, rupee's fall, Adani group concerns, rising crude oil, geopolitical uncertainty, and banking sector sell-off. Broader market indices also declined sharply.
टॅग्स :स्टॉक मार्केटशेअर बाजारगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी