Join us
Daily Top 2Weekly Top 5

आठवड्यात शेअर बाजार तब्बल ५% घसरला! गुंतवणूकदारांसाठी संधी की अजून वाट पाहावी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 14:14 IST

Stock Markets Crash : इराणवर अमेरिका-इस्रायलने केलेला हल्ला आणि त्यानंतर इराणने केलेल्या प्रत्युत्तर हल्ल्यामुळे बाजारातील दबाव आणखी वाढला आहे. परिणामी, गेल्या आठवड्यात प्रमुख बाजार निर्देशांक जवळपास ५% ने घसरले आहेत.

Stock Markets Crash : मध्यपूर्वेतील इस्राईल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा वणवा पाचव्या दिवशीही धुमसत असल्याने जागतिक बाजारपेठांसह भारतीय शेअर बाजारातही मोठी पडझड झाली आहे. बुधवारी दुपारच्या सत्रापर्यंत सेन्सेक्सने १,५५८ अंकांची तर निफ्टीने ५०४ अंकांची मोठी डुबकी लावली. युद्धाच्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण असून, सर्वच क्षेत्रांतील शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री पाहायला मिळत आहे.

बाजारातील पडझडीची भीषण आकडेवारी (दुपारी १२ वाजेपर्यंत)सेन्सेक्स: १५५८ अंकांनी घसरून ७८,६७२ वर.निफ्टी ५०: ५०४ अंकांनी घसरून २४,३६५ वर.बँक निफ्टी: १३१० अंकांनी घसरून ५८,५२१ वर.

दिग्गज कंपन्यांचे शेअर्स रसातळालाविशेष म्हणजे, ज्या कंपन्यांचे फंडामेंटल्स मजबूत आहेत, अशा मार्केट लीडर्सनाही या विक्रीच्या लाटेने सोडले नाही.टाटा स्टील: ६.७८% घटएल अँड टी : ६.२६% घटगेल : ५.६९% घटबँक ऑफ बडोदा: ५.१४% घटयाशिवाय अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील आणि जिंदाल स्टील यांसारखे मेटल आणि इन्फ्रा स्टॉक्सही मोठ्या प्रमाणावर तुटले आहेत.

युद्धाचा विळखा आणि बाजारावर दबाव२८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेले अमेरिका-इस्राईल आणि इराणमधील युद्ध आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. दोन्ही बाजू झुकण्यास तयार नसल्याने कच्च्या तेलाचा पुरवठा आणि जागतिक व्यापारावर परिणाम होण्याची भीती आहे. गेल्या एका आठवड्यात प्रमुख निर्देशांकात ५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

गुंतवणूकदारांनी आता काय करावे?

  • तज्ज्ञांच्या मते, सध्या बाजारात मोठी जोखीम आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात.
  • नव्या गुंतवणुकीत सावधगिरी: केवळ जास्त जोखीम घेण्याची क्षमता असलेल्यांनीच 'क्वालिटी' शेअर्समध्ये हळूहळू गुंतवणूक करावी.
  • बाजार निवळण्याची प्रतीक्षा: जोपर्यंत युद्धाबाबत काही सकारात्मक बातमी येत नाही, तोपर्यंत बाजारावर दबाव कायम राहील.
  • SIP बंद करू नका: म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी आपली SIP चुकूनही बंद करू नये. पडत्या बाजारात तुम्हाला स्वस्त भावात 'युनिट्स' मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. जेव्हा बाजार पुन्हा सावरतो, तेव्हा याच गुंतवणुकीतून मोठा नफा मिळतो.

वाचा - व्यवसाय सुरू करण्यासाठी नोकरी सोडल्याने लोकांनी काढलं वेड्यात; आज उभे केले १५० कोटींचे साम्राज्य!

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

 

English
हिंदी सारांश
Web Title : Stock Market Plunges 5% Weekly: Opportunity or Wait for Investors?

Web Summary : Amidst Middle East tensions, Indian stock markets crashed, with Sensex and Nifty plummeting. Experts advise caution, suggesting gradual investment in quality shares for risk-takers. SIP investors should continue for long-term gains.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी