Share Market Today : जागतिक बाजारात चांगले संकेत असताना भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी कोसळला. यापूर्वी सलग ७ दिवसात बाजाराने चांगला वेग पकडला होता. सेन्सेक्स ५८९ अंकांनी घसरून बंद झाला, तर निफ्टी २४,००० च्या जवळ घसरला. आज गुंतवणूकदारांना सुमारे ९ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सावध दिसले. याशिवाय, कंपन्यांचे कमकुवत तिमाही आणि नफा बुकिंग देखील बाजारातील घसरणीत कारणीभूत ठरली.
स्मॉल आणि मिडकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरणस्मॉल आणि मिडकॅप शेअर्सना आणखी जोरदार फटका बसला. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांक २.५ टक्क्यांनी घसरले. आयटी वगळता, इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकही लाल रंगात बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स ५८८.९० अंकांनी घसरून ७९,२१२.५३ वर बंद झाला. दुसरीकडे, ५० शेअर्सचा एनएसई निर्देशांक निफ्टी २०७.३५ अंकांनी घसरून २४,०३९.३५ वर बंद झाला.
गुंतवणूकदारांचे ८.८ लाख कोटी रुपयांचे नुकसानबीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज ४२०.८३ लाख कोटी रुपयांवर घसरले, जे मागील व्यापार दिवशी म्हणजे गुरुवार, २४ एप्रिल रोजी ४२९.६३ लाख कोटी रुपयांवरून कमी झाले. तर दुसरीकडे, आज बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे ८.८ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे ८.८ लाख रुपयांची घट झाली आहे.
सेन्सेक्समध्ये हे ५ शेअर्स वधारलेसेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३० कंपन्यांपैकी ६ शेअर्स आज हिरव्या रंगात बंद झाले. यामध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स सर्वाधिक वधारले.
वाचा - सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
या शेअर्सनी खाल्ला सर्वाधिक मारअॅक्सिस बँकेचा शेअर ३.५० टक्क्यांनी घसरला. अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा आणि इटर्नल यांचे शेअर्सही तोट्यात राहिले.