Stock Market Highlights : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजीचे वारे पाहायला मिळाले. बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी जोरदार उसळी घेतली. दिवसभराच्या व्यवहारानंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६५०.३९ अंकांच्या तेजीसह ८३,२७७.१५ च्या पातळीवर बंद झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २११.६५ अंकांनी वधारून २५,६८२.७५ वर स्थिरावला.
'या' शेअर्सनी मारली बाजीआजच्या सत्रात पॉवर आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांनी बाजाराला सावरले. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, कोल इंडिया, एचडीएफसी बँक, अदानी एंटरप्रायझेस आणि ॲक्सिस बँक या शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली. दुसरीकडे, ऑटो आणि टेक शेअर्समध्ये नफावसुली झाली. यात टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, मारुती सुझुकी, आयशर मोटर्स आणि एम अँड एम या शेअर्सना फटका बसला.
पॉवर आणि बँकांमध्ये 'करंट'क्षेत्रीय निर्देशांकांचा विचार करता, पॉवर, पीएसयू बँक, रिअल्टी आणि खासगी बँकांच्या निर्देशांकात १ ते २ टक्क्यांची वाढ झाली. मात्र, ऑटो आणि मीडिया क्षेत्रात ०.५ ते १ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. मुख्य निर्देशांकांच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये फारशी हालचाल दिसली नाही. निफ्टी मिडकॅप ०.४ टक्क्यांनी वधारला, तर स्मॉलकॅप निर्देशांक सपाट बंद झाला.
वाचा - IT क्षेत्राचे भवितव्य टांगणीला? ८ दिवसांत ६ लाख कोटी रुपयांचे नुकसान; गुंतवणूकदारांनी काय करावं?
रुपयाच्या मूल्यात बदल नाहीपरकीय चलन बाजारात सोमवारी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ९०.६६ (प्रोव्हिजनल) या पातळीवर विनाबदल बंद झाला. देशांतर्गत शेअर बाजारातील तेजीमुळे रुपयाला बळ मिळाले, मात्र जागतिक बाजारात डॉलर वधारल्याने ही वाढ मर्यादित राहिली. कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमतींनी रुपयाला आधार दिला, पण परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे रुपयावर दबाव कायम होता. शुक्रवारी देखील रुपया ९०.६६ वरच बंद झाला होता.
Web Summary : Indian stock markets surged, fueled by banking and power sector gains. The Sensex rose 650.39 points to 83,277.15, and the Nifty gained 211.65 points to 25,682.75. Power Grid, HDFC Bank, and Axis Bank led the rally, while auto and tech stocks faced profit booking. The rupee remained stable.
Web Summary : भारतीय शेयर बाजार में तेजी, बैंकिंग और ऊर्जा क्षेत्र के शेयरों में लाभ। सेंसेक्स 650.39 अंक बढ़कर 83,277.15 पर, और निफ्टी 211.65 अंक बढ़कर 25,682.75 पर। पावर ग्रिड, एचडीएफसी बैंक ने बढ़त बनाई, जबकि ऑटो और टेक शेयरों में मुनाफावसूली हुई। रुपया स्थिर रहा।