Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स २,९४६ अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,००० च्या उंबरठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 16:55 IST

Stock Market : मध्यपूर्वेतील युद्धविरामाच्या घोषणेमुळे आज शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली.

Stock Market : मध्यपूर्वेतील युद्धविरामाच्या घोषणेमुळे आज(९ एप्रिल) रोजी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. दिवसअखेर BSE Sensex २,९४६.३२ अंकांनी (३.९५%) वाढून ७७,५६२.९० वर बंद झाला, तर Nifty 50 ८३७.७० अंकांच्या (३.७८%) उसळीसह २३,९९७.३५ वर बंद झाला. निफ्टी २४,००० च्या पातळीच्या अगदी जवळ पोहोचल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाजाराची एकूण स्थिती

आजच्या व्यवहारात ३,६९८ शेअर्समध्ये वाढ झाली, तर ५०५ शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. यादरम्यान, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही मोठी तेजी पाहायला मिळाली. दोन्ही निर्देशांकांमध्ये सुमारे ४% वाढ नोंदवली गेली.

सर्वाधिक वाढलेले आणि घसरण झालेले शेअर्स

Shriram FinanceAdani EnterprisesTata MotorsInterGlobe AviationEicher Motors

तर घसरण झालेल्या शेअर्समध्ये

Coal IndiaTech MahindraNestle IndiaWiproONGC

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Stock Market Soars: Sensex Rallies, Nifty Nears 24,000 Mark

Web Summary : Middle East truce fuels Indian stock market surge. Sensex jumps 2,946 points, Nifty closes near 24,000, driven by broad-based buying. Shriram Finance and Adani Enterprises lead gainers; Coal India lags.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूक