Join us

अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार चमकला; सेन्सेक्स 77,500 तर निफ्टी 23,500 अकांवर बंद..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:39 IST

Stock Market: देशाचा अर्थसंकल्प उद्या(1 फेब्रुवारी 2025) सादर केला जाणार आहे. त्याचा परिणाम आजच्या व्यवहारावर दिसून आला.

Budget 2025 Stock Market Live: देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प उद्या(1 फेब्रुवारी 2025) रोजी सादर केला जाणार आहे. त्याचा सकारात्मक परिणाम आजच्या(31 जानेवारी) शेअर बाजारावर दिसून आला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स शुक्रवारी ग्रीन झोनमध्ये उघडला अन् काही मिनिटांतच 180 अंकांनी वाढला. याशिवाय, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 50 देखील वाढीसह हिरव्या चिन्हावर उघडला.

ग्रीन झोनमध्ये सुरुवात शेअर बाजारातील व्यवहार शुक्रवारी ग्रीन झोनमध्ये सुरू झाले. बीएसई सेन्सेक्स 76,888.89 च्या पातळीवर उघडला अन् काही मिनिटांतच 76,947.92 च्या पातळीवर पोहोचला. दिवसाखेर सेन्सेक्स 77,500.57 वर बंद झाला. तर, निफ्टीत्या 23,296.75 वर उघडला अन् दिवसाखेर 23,508.40 पर्यंत पोहोचला.

हे 10 शेअर्स वधारलेशुक्रवारी शेअर बाजारात व्यवहार सुरू होता; L&T शेअर (4.70%), टायटन (2.80%), मारुती (1.90%), Infosys (1.50%) यांनी लार्ज कॅपमध्ये झेप घेतली, तर मिडकॅपमध्ये कल्याण ज्वेलर्स शेअर (6.73%), सुझलॉन (3.80%), बायोकॉन (3.20%) आणि फिनिक्स शेअर (3.05%) वाढले. याशिवाय स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुलपोली शेअर (19.88%) आणि पॉवर इंडिया शेअर (11.29%) पर्यंत वधारले. 

1669 शेअर्स ग्रीन झोनमध्ये सुरू सकारात्मक जागतिक संकेतांदरम्यान दोन्ही शेअर बाजार निर्देशांकांनी जोरदार सुरुवात केली. या कालावधीत बाजारातील सुमारे 1669 कंपन्यांचे शेअर्स हिरव्या चिन्हावर उघडले, तर 829 कंपन्यांचे शेअर्स लाल चिन्हावर उघडले. याशिवाय 102 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही व्यवहार झाला नाही. यापूर्वी गुरुवारी शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांकांमध्ये चढ-उतार दिसून आला होता. सेन्सेक्स आणि निफ्टी कधी हिरव्या तर कधी लाल रंगात व्यवहार करत होते. आता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजाराची काय परिस्थिती असेल, हे पाहणे महत्वाचे आहे. 

(टीप- शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकव्यवसाय