Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाजार सावरता सावरेना! सलग दुसऱ्या दिवशी घसरण; बँकिंग शेअर्सना विक्रीचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 16:46 IST

Stock Market : सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली असून यामध्ये बँकिंग शेअर्सना सर्वाधिक फटका बसला.

Stock Market : भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी कमालीची अस्थिरता पाहायला मिळाली. मंगळवारच्या मोठ्या पडझडीनंतर बुधवारीही बाजार सावरण्यात अपयशी ठरला. विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी लाल निशाणीत व्यवहार पूर्ण केला. बँकिंग क्षेत्रातील दिग्गज शेअर्समधील घसरणीचा बाजारावर मोठा परिणाम झाला.

बाजाराची आजची स्थितीमंगळवारी सेन्सेक्स १०६५ अंकांनी कोसळला होता, त्या तुलनेत आजची घसरण मर्यादित असली तरी गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.

बँकिंग शेअर्समध्ये पडझड, 'इटरनल' तेजीतआजच्या सत्रात 'इटरनल'च्या शेअर्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा शेअर ४.९८ टक्क्यांनी वधारून टॉप गेनर ठरला. दुसरीकडे, खाजगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या आयसीआयसीआई बँकेच्या शेअर्समध्ये १.९६ टक्क्यांची मोठी घसरण झाली. सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ १३ शेअर्स आज वाढ नोंदवू शकले, तर १७ शेअर्समध्ये घसरण झाली.

आजचे टॉप गेनर्स (तेजीत राहिलेले शेअर्स)

कंपनीवाढ (%)
इटरनल+४.९८%
अल्ट्राटेक सिमेंट+१.५७%
इंडिगो+१.३७%
रिलायन्स इंडस्ट्रीज+०.७५%
टाटा स्टील+०.४९%

आजचे टॉप लूझर्स (घसरलेले शेअर्स)

कंपनीघसरण (%)
आयसीआयसीआय बँक-१.९६%
ट्रेंट-१.७८%
बीईएल-१.५९%
एचडीएफसी बँक-१.१८%
एल अँड टी-१.१३%

सेक्टोरल अपडेट्सआयटी क्षेत्रातील टीसीएस (०.४३%) आणि टेक महिंद्रा (०.४०%) या कंपन्यांनी बाजार सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र अ‍ॅक्सिस बँक, कोटक बँक आणि एसबीआय यांसारख्या बँकिंग शेअर्समधील विक्रीमुळे निर्देशांकावर दबाव कायम राहिला. ऑटो क्षेत्रात मारुती सुझुकी आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्यात संमिश्र कल पाहायला मिळाला.

वाचा - 'विकसित भारत' की 'कॉर्पोरेट हित'? निर्मला सीतारमण यांच्या पोतडीतून काय निघणार?

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

 

English
हिंदी सारांश
Web Title : Market struggles to recover; banking shares take a hit.

Web Summary : Indian stock market faced volatility for the second consecutive day. Banking sector shares declined, impacting indexes. Eternal shares gained, while ICICI Bank shares saw a significant drop. Investors remain cautious.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूकनिर्देशांकनिफ्टी