Join us

शेअर बाजारात तीव्र चढ-उतार; सेन्सेक्स 80500 वर, तर निफ्टी 24300 वर बंद...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 17:10 IST

Stock Market Closing Highlights: अदानी पोर्ट्स, बजाज फायनान्स, रिलायन्स, एसबीआयला सर्वाधिक फायदा.

Stock Market Closing Highlights: आज(शुक्रवार) देशांतर्गत शेअर बाजारात तीव्र चढउतार दिसून आला. पण, दिवसाखेर बाजारात वाढ झाली. दिवसाखेर सेन्सेक्स 259 अकांनी वाढून 80501 वर पोहोचला, तर निफ्टी 12 अंकांनी वाढून 24346 वर बंद झाला.

निफ्टीमध्ये अदानी पोर्ट्स, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय हे सर्वाधिक वाढलेले शेअर होते. तर, जेएसडब्ल्यू स्टील, आयशर मोटर्स, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, एचडीएफसी लाईफ हे पिछाडीवर होते. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.4 टक्क्यांनी घसरला, तर स्मॉलकॅप निर्देशांक स्थिर राहिला. क्षेत्रीय निर्देशांकांवर नजर टाकल्यास, मीडिया, ऊर्जा, आयटी, तेल आणि वायू 0.3-0. टक्क्यांनी वधारले, तर पॉवर, मेटल, टेलिकॉम, फार्मा, रिअल्टी आणि कंझ्युमर ड्युरेबल्स 0.5-2 टक्क्यांनी घसरले.

देशांतर्गत आघाडीवर सकारात्मक ट्रिगर्स आहेत. काल आर्थिक आघाडीवर एक मोठी बातमी आली. एप्रिलमध्ये जीएसटी संकलनाने विक्रमी पातळी गाठली. 12.6 टक्के वाढीसह, जीएसटी संकलन पहिल्यांदाच 2 लाख 37 हजार कोटींवर पोहोचले आहे. दुसरीकडे, बुधवारी एफआयआयनी दोन वर्षांनंतर सलग 11 व्या दिवशी रोखीने खरेदी केली. बुधवारी, एफआयआय आणि डीआयआय दोघांनीही सलग चौथ्या दिवशी खरेदी केली. एफआयआयनी 4450 कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली तर देशांतर्गत निधींनी 1800 कोटी रुपयांची खरेदी केली. गिफ्ट निफ्टी 24400 च्या जवळ स्थिर होता. 

(टीप- शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक