Share Market Today : नव्या आर्थिक वर्षाचा (२०२६-२७) पहिला दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत शुभ ठरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पडझडीला पूर्णविराम देत, आज बाजाराने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी होण्याच्या संकेतांमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून, सेन्सेक्स आणि निफ्टीने आज जोरदार पुनरागमन केले आहे.
सेन्सेक्स १,१८६ अंकांनी वधारलादिवसभर चाललेल्या तुफान खरेदीमुळे दोन्ही प्रमुख निर्देशांक मोठ्या नफ्यात बंद झाले.
- सेंसेक्स : १,१८६.७७ अंकांच्या (१.६५%) वाढीसह ७३,१३४.३२ वर स्थिरावला.
- निफ्टी ५० : ३४८ अंकांच्या (१.५६%) मजबुतीसह २२,६७९.४० च्या पातळीवर बंद झाला.
- मार्केट कॅपमध्ये झेप : बीएसईमधील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ४१२.४१ लाख कोटींवरून ४२२.२३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच आज एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ९.८२ लाख कोटींची भर पडली आहे.
मिडकॅप आणि स्मॉलकॅपचा जलवामुख्य निर्देशांकांपेक्षाही आज ब्रॉड मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. निफ्टी मिडकॅप २.२ टक्क्यांनी वधारला, तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये ३.३ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली. सर्वच क्षेत्रीय निर्देशांक आज 'हिरव्या' निशाणात बंद झाले.
आजचे 'हिरो' आणि 'झिरो'नफा देणारे ५ प्रमुख शेअर्स
- ट्रेंट : ६.७४% (सर्वात मोठी वाढ)
- इंडिगो : ६.०१%
- अदानी पोर्ट्स: ५.३१%
- भारत इलेक्ट्रॉनिक्स : ४.५७%
- स्टेट बँक ऑफ इंडिया : ३.८९%
घसरण झालेले ५ प्रमुख शेअर्स
- एनटीपीसी : १.६४% (टॉप लूझर)
- सन फार्मा : १.२५%
- पॉवर ग्रिड : ०.९४%
- अल्ट्राटेक सिमेंट : ०.४२%
- भारती एअरटेल : ०.१३%
बाजारातील इतर घडामोडीआज बीएसईवर एकूण ४,४३७ शेअर्समध्ये व्यवहार झाला. त्यापैकी ३,८२८ शेअर्स तेजीत बंद झाले, तर ५०८ शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. विशेष म्हणजे ६२ शेअर्सनी आपला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला.
वाचा - ATM मधून पैसे काढणे महागले; आजपासून नवीन नियम लागू, २३ रुपयांचे शुल्क कसे वाचवायचे?
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
Web Summary : Indian stock market rebounds sharply after US-Iran tensions ease. Sensex jumps 1,186 points, Nifty up 348. Investors wealth increases by ₹9.82 lakh crore in a single day. Trent and Indigo are top gainers; NTPC biggest loser.
Web Summary : अमेरिकी-ईरान तनाव कम होने से भारतीय शेयर बाजार में जोरदार तेजी। सेंसेक्स 1,186 अंक ऊपर, निफ्टी 348 अंक चढ़ा। निवेशकों की संपत्ति में एक ही दिन में ₹9.82 लाख करोड़ की वृद्धि। ट्रेंट और इंडिगो टॉप गेनर; एनटीपीसी सबसे बड़ा लूजर।