Share Market Closing: भारतीय शेअर बाजार दीपावलीच्या निमित्तानं सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीसह ग्रीन झोनमध्ये बंद झाला. कामकाजाच्या अखेरीस सेन्सेक्स ४४१.१८ अंकांनी किंवा ०.४९ टक्के तेजीसह ८३,८४,३६३.३७ वर, तर निफ्टी १३३.३० अंकांनी किंवा ०.५२ टक्के वाढीसह २५,८४३.१५ वर बंद झाला. सत्रादरम्यान सेन्सेक्सनं ८४,६५६.५६ आणि निफ्टीनं २५,९२६.२० चा उच्चांक गाठला.
तेजीमध्ये मोठा वाचा पीएसयू बँकांचा (PSU Bank) होता. निफ्टी पीएसयू बँक इंडेक्स कामकाजाच्या अखेरीस २.८७ टक्के मजबूत होऊन बंद झाला. याव्यतिरिक्त, निफ्टी इन्फ्रा १.३२ टक्के तेजीसह आणि निफ्टी ऑइल अँड गॅस १.४२ टक्के तेजीसह ग्रीन झोनमध्ये बंद झाला. निफ्टी ऑटो ०.१६ टक्के, फायनान्शियल सर्व्हिस ०.१२ टक्के, एफएमसीजी ०.०३ टक्के आणि निफ्टी मेटल ०.०७ टक्के घसरणीसह बंद झाले.
सेन्सेक्स पॅकमध्ये बजाज फिनसर्व्ह, ॲक्सिस बँक, एसबीआय, टीसीएस, टायटन, भारती एअरटेल, इन्फोसिस, बजाज फायनान्स आणि एल अँड टी टॉप गेनर्सच्या यादीत समाविष्ट होते. तर, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम, इटर्नल आणि पॉवरग्रिड टॉप लूजर्सच्या यादीत समाविष्ट राहिले.
उद्या मुहूर्त ट्रेडिंग
दरवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग प्रथा आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मुहूर्त ट्रेडिंगसाठी शेअर बाजार खुला होईल. यावेळी मुहूर्त ट्रेडिंग २१ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे. परंतु यावेळी मुहूर्त ट्रेडिंगसाठी असलेल्या वेळेत मात्र बदल करण्यात आलाय. दुपारी १.४५ वाजता कामकाजासाठी बाजार उघडेल आणि २.४५ वाजता बंद होईल. ट्रेडिंगमध्ये बदल करण्याची अंतिम वेळ १४:५५ वाजेपर्यंत असेल. मुहूर्त ट्रेडिंग हे दिवाळीच्या सणाचं आणि नवीन संवत २०८२ वर्षाच्या सुरुवातीचं प्रतीक आहे.
Web Summary : Indian stock market closed green on Diwali. Sensex rose 0.49% to 84,363.37, Nifty up 0.52% to 25,843.15. PSU banks led gains. Muhurat trading is scheduled for tomorrow, October 21, 2025, from 1:45 PM to 2:45 PM.
Web Summary : दिवाली पर भारतीय शेयर बाजार तेजी के साथ हरे निशान में बंद हुआ। सेंसेक्स 0.49% बढ़कर 84,363.37 पर, निफ्टी 0.52% बढ़कर 25,843.15 पर पहुंचा। पीएसयू बैंक लाभ में रहे। कल, 21 अक्टूबर, 2025 को दोपहर 1:45 से 2:45 बजे तक मुहूर्त ट्रेडिंग होगी।