Share Market Update : शेअर बाजारात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी गॅप अप ओपनिंग झालं आणि निफ्टी ९१ अंकांच्या वाढीसह २४३६७ वर उघडला, तर सेन्सेक्स २८१ अंकांच्या वाढीसह ८०५२९ वर उघडला. सलग दुसऱ्या दिवशी भारतीय बाजारपेठेवर खरेदीदारांचा विश्वास दिसून येत असून बाजारात पुन्हा तेजी येताना दिसत आहे.
मंगळवारी निफ्टीचं ओपनिंग रेझिस्टंस लेव्हलवर झाल्याचं दिसलं. बऱ्याच काळानंतर निफ्टी पुन्हा एकदा बेस बनवून पुढे जात असला तरी २४३७०-२४४०० च्या झोनमध्ये निफ्टीसाठी मोठा अडथळा आहे. हा झोन मोडला तरच निफ्टी २४५०० च्या दिशेने जाऊ शकतो.
या शेअर्समध्ये तेजी / घसरण
अदानी समूहाच्या शेअर्समध्येही आज मोठी तेजी दिसून येत आहे. सलग पाचव्या सत्रात अदानी समूहाच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. निफ्टी ५० च्या टॉप गेनर्समध्ये अदानी पोर्ट्स ३ टक्क्यांनी वधारला. तर अदानी एंटरप्रायझेसमध्येही १.५० टक्क्यांची वाढ झाली आहे. श्रीराम फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी बँक, ओएनजीसी या कंपन्यांचे शेअर्सही निफ्टी ५० च्या सर्वाधिक तेजीमध्ये दिसून आले. आयटीसी, सन फार्मा, भारती एअरटेल, टाटा कन्झ्युमर, कोटक बँक हे शेअर्स निफ्टी ५० चे टॉप लूजर्स ठरले आहेत.
सुरुवातीच्या व्यवहारात पीएसयू बँक, डिफेन्स स्टॉक, मेटल सेक्टरमध्ये चांगली खरेदी दिसून येत आहे, तर एफएमसीजी, आयटी, फार्मा सेक्टरमध्ये विक्रीचा दबाव दिसून येत आहे.