Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजारात तुफान तेजी, गुंतवणूकदारांनी कमावले ₹३.२२ लाख कोटी; पाहा कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 16:26 IST

2 नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजार जबरदस्त वाढीसह बंद झाले.

Share Market Update:  2 नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजार जबरदस्त वाढीसह बंद झाले. सेन्सेक्सनं 490 अंकांची उसळी घेतली. निफ्टीनंही 19,100 चा टप्पा पार केला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सचे निर्देशांकही 1 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. त्यामुळे शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांना आज सुमारे 3.22 लाख कोटी रुपयांचा नफा झाला. बाजाराच्या वाढीसाठी सर्वात मोठा आधार मजबूत जागतिक संकेतांमुळे आला. बुधवारी रात्री उशिरा यूएस फेडरल रिझर्व्हने सलग दुसऱ्यांदा व्याजदर न वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गुरुवारी गुंतवणूकदारांमध्ये उत्साह दिसून आला. सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढीसह बंद झाले. रियल्टी आणि टेलिकम्युनिकेशन शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली.व्यवहाराच्या अखेरिस बीएसई सेन्सेक्स 489.57 अंकांनी किंवा 0.77 टक्क्यांनी घसरून 64,080.90 वर बंद झाला. एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 144.10 अंकांनी किंवा 0.76 टक्क्यांनी वाढून 19,133.25 वर बंद झाला.गुंतवणूकदारांनी कमावले ३.२२ लाख कोटीबीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 2 नोव्हेंबर रोजी वाढून 313.44 लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे बुधवारी 310.22 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप आज सुमारे 3.22 लाख कोटी रुपयांनी वाढलं. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 3.22 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.या शेअर्समध्ये तेजीसेन्सेक्समधील 30 पैकी 28 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. त्यातही इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2 टक्क्यांनी वाढ झाली. तर टाटा स्टील, टाटा मोटर्स, सन फार्मा आणि इन्फोसिसचे शेअर्स 1.40 टक्के ते 1.67 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.यामध्ये घसरणआज सेन्सेक्सचे फक्त 2 शेअर्स लाल रंगात म्हणजेच घसरणीसह बंद झाले. यामध्येही टेक महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक 0.59 टक्क्यांनी घसरले. तर बजाज फायनान्सचा शेअर 0.10 टक्क्यांनी घसरून बंद झाला.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक