Join us

Stock Market : गुरुवारच्या तेजीनंतर शुक्रवारी बाजार मंदावला; Sensex-Nifty मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 09:42 IST

Stock Market Opening : देशांतर्गत शेअर बाजारात दोन दिवसांत बरीच वाढ झाली होती, मात्र शुक्रवारी (३ जानेवारी) आठवड्याच्या अखेरच्या दिवशी जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळाल्यानं शेअर बाजारातील कामकाजाला घसरणीसह सुरुवात झाली.

Stock Market Opening : देशांतर्गत शेअर बाजारात दोन दिवसांत बरीच वाढ झाली होती, मात्र शुक्रवारी (३ जानेवारी) आठवड्याच्या अखेरच्या दिवशी जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळाल्यानं शेअर बाजारातील कामकाजाला घसरणीसह सुरुवात झाली. सेन्सेक्स १४० अंकांनी घसरून ७९,८०० च्या आसपास होता. तर निफ्टी २८ अंकांच्या घसरणीसह २४,१०० च्या वर होता. बँक निफ्टी ५१,६०० च्या आसपास फ्लॅट दिसला. काल वाढलेल्या आयटी आणि ऑटो निर्देशांकात आज तेथून दबाव आल्याचं दिसून आलं.

निफ्टीवर ओएनजीसी, एचसीएल टेक, एसबीआय इंडिया, इंडसइंड बँक, एसबीआय लाइफ या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. हीरो मोटोकॉर्प, टीसीएस, आयटीसी, सिप्ला, विप्रो या शेअरमध्ये घसरण झाली.

गुरुवारी सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वधारला होता. कालच्या शानदार तेजीमुळे एफआयआयच्या ११ दिवसांच्या विक्रीचा सपाटाही थांबला. कॅश, इंडेक्स आणि शेअर फ्युचर्समध्ये १५,००० कोटी रुपयांची जोरदार खरेदी झाली.

जागतिक बाजारातील अपेडेट्स

गिफ्ट निफ्टी जवळपास १०० अंकांच्या वाढीसह २४,१८५ वर व्यवहार करत होता. मात्र, डाऊ फ्युचर्स मध्ये किंचित तेजी होती. वर्षाच्या पहिल्या ट्रेडिंग सेशनच्या दमदार सुरुवातीनंतर काल अमेरिकन बाजारात घसरण झाली होती. डाऊ दिवसाच्या उच्चांकी पातळीपेक्षा १५० अंकांनी खाली बंद झाला, तर नॅसडॅक एप्रिलनंतर प्रथमच सलग पाचव्या दिवशी ३० अंकांनी घसरला. 

कच्च्या तेलाची किंमत २ टक्क्यांनी वधारून ७६ डॉलरच्या दोन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. सोनं ३० डॉलरने वधारून २६७५ डॉलर आणि चांदी २ टक्क्यांनी वधारून ३० डॉलरवर पोहोचली. देशांतर्गत सराफा बाजारात सोनं ८०० रुपयांनी वधारून ७७,७०० रुपयांवर तर चांदी १४०० रुपयांनी वधारून ८९,००० रुपयांवर बंद झाली. डॉलर निर्देशांक २६ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. त्यात सलग तिसऱ्या दिवशी वाढ होऊन तो १०९ वर पोहोचला आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक