Stock in focus:शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी कमी कालावधीत गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. अशाच शेअर्समध्ये Bharat Electronics Limited, Tata Steel आणि Titan चा समावेश आहे. या तिन्ही शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात जोरदार तेजी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या काळात BSE Sensex निर्देशांकात सुमारे ०.०८% घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की, आता प्रॉफिट बुक करावा की, अजून होल्ड करावे?
BEL: डिफेन्स क्षेत्रात चांगली कामगिरी
गेल्या एका वर्षात BEL च्या शेअर्समध्ये ५६.७९% वाढ झाली आहे. शुक्रवारी हा शेअर १.५६% वाढीसह ४६२.७० रुपयांवर बंद झाला. विशेष म्हणजे, या शेअरने मागील दोन वर्षांत ९८%, तर तीन वर्षांत तब्बल ३५५% रिटर्न दिला आहे. कंपनीचे मार्केट कॅप सुमारे ३.३८ लाख कोटी रुपये असून, सध्या कंपनीकडे ७५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्तीच्या ऑर्डर्स आहेत.
टार्गेट प्राइस (ब्रोकरेज अंदाज):
निर्मल बॅंग: ₹४९४नुवामा: ₹५२५ (BUY रेटिंग कायम)Elara Capital: ₹४७८
मजबूत ऑर्डर बुक आणि डिफेन्स सेक्टरमधील वाढती मागणी पाहता, दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा स्टॉक अजूनही आकर्षक मानला जात आहे.
टाटा स्टील: कमोडिटी सायकलचा फायदा
टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात ५४.६१% वाढ झाली आहे. शुक्रवारी शेअर २१२.०५ रुपयांवर बंद झाला. सध्या कंपनीचे मार्केट कॅप २.६४ लाख कोटी रुपये आहे.
टार्गेट प्राइस:
Macquarie: Outperform रेटिंग₹२४१ (Macquarie)₹२१५ (Elara)₹२४० (Anand Rathi)
स्टील सेक्टरमध्ये सुधारणा आणि मागणी वाढल्यामुळे शेअरला सपोर्ट मिळत आहे. मात्र हा सायक्लिकल सेक्टर असल्याने गुंतवणूक करताना काळजी आवश्यक आहे.
टायटन: स्थिर पण प्रीमियम व्हॅल्यूएशन
टायटन कंपनीने गेल्या एका वर्षात ३६% परतावा दिला आहे. शुक्रवारी शेअर ४५२६.३० रुपयांवर बंद झाला. सध्या कंपनीचे मार्केट कॅप ४.०१ लाख कोटी रुपये आहे.
टार्गेट प्राइस:
HDFC Securities: ₹४००० (Reduce रेटिंग)Goldman Sachs: ₹५००० (BUY रेटिंग)
कंपनीचा ब्रँड आणि रिटेल विस्तार मजबूत असला तरी सध्याचे व्हॅल्यूएशन थोडे महाग मानले जात आहे.
(टीप- हा गुंतवणुकीची सल्ला नाही. शेअर बाजार जोखमीच्या अधीन आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.)
Web Summary : Bharat Electronics, Tata Steel, and Titan shares surged, offering strong returns. BEL rose 56.79%, Tata Steel 54.61%, and Titan 36%. Experts advise caution due to market risks and valuations. Consult financial advisors before investing.
Web Summary : भारत इलेक्ट्रॉनिक्स, टाटा स्टील और टाइटन के शेयरों में उछाल, निवेशकों को अच्छा रिटर्न मिला। बीईएल 56.79%, टाटा स्टील 54.61% और टाइटन 36% बढ़ा। विशेषज्ञ बाजार जोखिमों और मूल्यांकन के कारण सावधानी बरतने की सलाह देते हैं। निवेश से पहले वित्तीय सलाहकारों से सलाह लें।