Join us

१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 17:23 IST

Multibagger Stock: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना सतत जबरदस्त परतावा देत आहेत. त्यापैकी एक असा मल्टीबॅगर शेअर आहे ज्याने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवलं आहे.

Multibagger Stock: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात तेजी आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना सतत जबरदस्त परतावा देत आहेत. त्यापैकी एक असा मल्टीबॅगर शेअर आहे ज्याने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवलं आहे. हा शेअर बऱ्याच काळापासून शेअर बाजारात रॉकेट बनलाय. इतकंच नाही तर या शेअरनं अनेक वेळा अपर सर्किटलाही स्पर्श केला आहे. या शेअरचं नाव आहे सोभाग्य मर्कंटाईल लिमिटेड (Sobhagya Mercantile Limited).

सोभाग्य मर्कंटाईल ही एक छोटी कंपनी आहे, पण शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून येत आहे. गुरुवारी कंपनीचा शेअर ९२०.६० रुपयांवर होता. दरम्यान, ही किंमत १८ ऑगस्ट रोजीच गाठली आहे. तेव्हापासून त्यात कोणतेही व्यवहार झालेले नाहीत. परंतु गेल्या काही वर्षांत तिनं गुंतवणूकदारांवर पैशांचा वर्षाव केलाय. एकेकाळी या शेअरची किंमत एक रुपयांपेक्षा कमी होती.

ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

दोन महिन्यांत दुप्पट परतावा

या शेअरनं दोन महिन्यांत गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिलाय. १८ जून रोजी या शेअरची किंमत सुमारे ४५३ रुपये होती. आता या शेअरची किंमत ९२०.६० रुपये आहे. अशा परिस्थितीत, या शेअरनं दोन महिन्यांत १०० टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय. जर तुम्ही दोन महिन्यांपूर्वी त्यात एक लाख रुपये गुंतवले असते तर ती रक्कम दोन लाख रुपये झाली असती. म्हणजेच तुम्हाला दुप्पट नफा मिळाला असता.

एका वर्षात केलं मालामाल

जर आपण एका वर्षाच्या परताव्याबद्दल बोललो तर त्यानं जबरदस्त परतावा दिला आहे. या स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. एका वर्षापूर्वी त्याची किंमत सुमारे ५५ रुपये होती. अशा परिस्थितीत, त्याचा एका वर्षाचा परतावा १५०० टक्क्यांहून अधिक आहे. जर तुम्ही एका वर्षापूर्वी कंपनीचे १ लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले असते, तर त्यांची किंमत आज १६ लाख रुपयांपेक्षा जास्त असती. म्हणजेच, १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर तुम्हाला एका वर्षात १५ लाख रुपयांपेक्षा जास्त नफा झाला असता.

कसं बनवलं कोट्यधीश?

या शेअरने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवलं आहे. तेही सुमारे ५० महिन्यांत म्हणजेच ४ वर्षांपेक्षा थोड्या जास्त काळात. मे २०२१ च्या सुरुवातीला शेअरची किंमत फक्त ९६ पैसे होती. तेव्हापासून या शेअरमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आता या शेअरची किंमत ९२०.६० रुपये आहे. म्हणजेच या काळात या शेअरनं सुमारे ९८००० टक्के परतावा दिला आहे. जर तुम्ही मे २०२१ च्या सुरुवातीला त्यात एक लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत ९.८१ कोटी रुपये (सुमारे १० कोटी रुपये) झाली असती.

कंपनी काय करते?

सोभाग्य मर्कंटाइल कंपनीची स्थापना १९८३ मध्ये झाली. ही पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपनी रस्ते आणि स्टीलचं उत्पादन करते. ती कोळसा आणि दगड यांसारखी खनिजे देखील काढते. याशिवाय, ती मोठ्या प्रकल्पांसाठी मशीन भाड्यानं देण्याचं काम करते. बीएसई वेबसाइटनुसार, कंपनीचं मार्केट कॅप ७७३.३० कोटी रुपये आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक