Join us

Stock Market Today: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजाराचं सुस्त ओपनिंग; निफ्टीही घसरला, NBFC-बँकिंग शेअर्समध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 09:52 IST

Stock Market Today: शुक्रवारी भारतीय शेअर बाजार किंचित घसरणीसह उघडला. प्रमुख बेंचमार्क निर्देशांकांमध्ये घसरण दिसून आली. बँ

Stock Market Today: शुक्रवारी भारतीय शेअर बाजार किंचित घसरणीसह उघडला. प्रमुख बेंचमार्क निर्देशांकांमध्ये घसरण दिसून आली. बँक निफ्टी किंचित तेजीसह उघडला. मिड-कॅप निर्देशांकातही खरेदी दिसून आली.

ट्रिगर्सबद्दल बोलायचं झालं तर, जागतिक संकेत, मोठं लिस्टिंग आणि आयटी क्षेत्रातील निकालांच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा असेल. परदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून सतत खरेदी केल्यान बाजारातील भावना मजबूत राहिल्या आहेत, तर अमेरिका आणि आशियाई बाजारातून संमिश्र संकेत दिसून येत आहेत.

जर्मनीपासून एक पाऊल दूर! ट्रम्प यांच्या निकटवर्तीयानंही मान्य केली भारताची ताकद, भागीदारीसाठी हात पुढे

अमेरिकन बाजारात नफा-वसुली दिसून आली. नॅस्डॅक आणि एस अँड पी ५०० हे विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर १८ अंकांनी घसरून बंद झाले, तर डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी जवळजवळ २५० अंकांनी घसरला. निफ्टी ३५ अंकांनी घसरून २५,२५० च्या जवळ व्यवहार करत आहे. आजच्या यूएस सप्टेंबरच्या रोजगार डेटापूर्वी, डाऊ फ्युचर्समध्ये ७० अंकांची वाढ दिसून येत आहे, तर निक्केई २५० अंकांनी खाली आहे.

FII कडून खरेदी

परदेशी गुंतवणूकदारांनी सलग तिसऱ्या दिवशी भारतीय बाजारात खरेदीचा जोर कायम ठेवला. काल, त्यांनी रोख रक्कम, निर्देशांक आणि स्टॉक फ्युचर्स या तिन्ही विभागांमध्ये एकूण ₹३,३०५ कोटींची गुंतवणूक केली. दरम्यान, देशांतर्गत निधी (DIIs) सलग ३२ व्या दिवशी निव्वळ खरेदीदार राहिले, ज्यामुळे बाजाराचा आत्मविश्वास आणखी वाढला.

English
हिंदी सारांश
Web Title : Stock market opens subdued; Nifty dips, NBFC and banking shares rise.

Web Summary : Indian stock market opened slightly lower Friday. Bank Nifty showed positive movement. Global cues, major listing, and IT sector results are key triggers. FIIs continue buying; DIIs boost market confidence.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक