SK Minerals IPO Listing: शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसली. याचा फायदा एसके मिनिरल्सला (SK Minerals) लिस्टिंगमध्ये मिळालाय. कंपनीची मजबूत लिस्टिंग झाली आहे. लिस्टिंगनंतर जोरदार खरेदीच्या कारणामुळे शेअर्समध्ये अपर सर्किटही लागलंय,.
१९% पेक्षा अधिक फायदा
बीएसईमध्ये एसके मिनिरल्सचे शेअर्स १४.१७ टक्के प्रीमियमसह १४५ रुपयांवर लिस्ट झाले. लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट लागलं. या तेजीनंतर कंपनीच्या शेअर्सचा भाव बीएसईमध्ये १५२.२५ रुपयांच्या इंट्रा-डे हायवर पोहोचला. सध्या हा स्टॉक त्याच्या इश्यू प्राइसपासून १९.८८ टक्क्यांनी वधारलाय.
शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
१० ऑक्टोबरला उघडला होता आयपीओ
एसके मिनरल्सचा आयपीओ १० ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान गुंतवणुकदारांसाठी खुला होता. कंपनीनं आयपीओसाठी १२० रुपये ते १२७ रुपये प्रति शेअर असा प्राइस बँड निश्चित केला होता. कंपनीनं १००० शेअर्सचा एक लॉट बनवला होता. परंतु किरकोळ गुंतवणूकदारांना कमीत कमी २००० शेअर्समध्ये एकाच वेळी गुंतवणूक करावी लागली. त्यामुळे गुंतवणुकदारांना किमान २,५४,००० रुपये गुंतवावे लागले होते.
अँकर गुंतवणूकदारांकडून ११.७२ कोटी रुपये उभारले
हा आयपीओ ३.५२ पट सबस्क्राइब झाला होता. रिटेल श्रेणीत कंपनीचा आयपीओ ३.३९ पट, क्यूआयबी (QIB) श्रेणीत १.०१ पट आणि एनआयआय (NII) श्रेणीत ७.१५ पट सबक्राइब झाला होता. एसके मिनरल्सचा आयपीओ अँकर गुंतवणूकदारांसाठी ९ ऑक्टोबरला उघडला होता. अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीनं ११.७२ कोटी रुपये उभारले होते. या एसएमई सेगमेंटच्या आयपीओचा आकार ४१.१५ कोटी रुपये होता. कंपनी आयपीओद्वारे ३२ लाख फ्रेश शेअर्स जारी केले आहेत.
Web Summary : SK Minerals IPO listed at ₹145, a 14.17% premium, then hit an upper circuit. Shares reached ₹152.25, nearly 20% above the issue price. The IPO was open October 10-14, priced at ₹120-₹127 per share and was oversubscribed 3.52 times.
Web Summary : एसके मिनरल्स आईपीओ ₹145 पर सूचीबद्ध हुआ, जो 14.17% प्रीमियम था, फिर अपर सर्किट हिट हुआ। शेयर ₹152.25 पर पहुंचे, जो निर्गम मूल्य से लगभग 20% अधिक है। आईपीओ 10-14 अक्टूबर को खुला था, जिसकी कीमत ₹120-₹127 प्रति शेयर थी और यह 3.52 गुना सब्सक्राइब हुआ था।