Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा व्याजदर वाढीचे संकेत? शेअर बाजारातही विक्रीचा दबाव  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 07:48 IST

व्याजदरांच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात माेठ्या प्रमाणावर विक्रीचा मारा दिसून आला. 

निर्देशांक सेन्सेक्स ५४१ अंकांनी घसरून ५९,८०६ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १६४ अंकांनी काेसळून १७,५८९ अंकांवर बंद झाला. 

शेअर बाजारावर चीनमधील वाढती महागाई आणि अमेरिकेतील बेराेजगारीची आकडेवारी तसेच व्याजदरांच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात माेठ्या प्रमाणावर विक्रीचा मारा दिसून आला. 

अमेरिकेत आणखी व्याजदर वाढीचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे वित्तिय संस्था, बॅंका तसेच वाहन क्षेत्रातील बहुतांश कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. बाजार उघडताच तेजी दिसून आली. मात्र, विक्रीच्या माऱ्यामुळे दुपारच्या सत्रात बाजारात घसरण झाली. रुपयादेखील डाॅलरच्या तुलनेत ६ पैशांनी घसरला.

टॅग्स :बँकशेअर बाजार