Join us

रॉकेट बनले स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स; पाच वर्षात ₹१ लाखाचे झाले ₹१.९ कोटी, तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 15:31 IST

Share Market: कंपनीचे मार्केट कॅप सोमवारी ६१७० कोटी रुपयांच्या पुढे गेले.

Share Market:शेअर बाजारात अनेक स्मॉल कॅप शेअर्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आदित्य व्हिजन लिमिटेड या स्मॉलकॅप शेअर यापैकी एक आहे. सध्या हा शेअर रॉकेट बनला आहे. सोमवारी बीएसईवर इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान आदित्य व्हिजनचे शेअर्स १३ टक्क्यांहून अधिक वाढून ४८३.६५ रुपयांवर पोहोचले. विशेष म्हणजे, ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीत या शेअरमध्ये १९००० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 

१ लाखाचे झाले १.९ कोटी 

आदित्य व्हिजन लिमिटेडच्या शेअर्सनी मल्टीबॅगर परतावा दिला आहे. १८ सप्टेंबर २०२० रोजी या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स फक्त २.४७ रुपयांवर होते. तर, आज(१८ ऑगस्ट २०२५) रोजी कंपनीचे शेअर्स ४८३.६५ रुपयांवर पोहोचले आहेत. या काळात कंपनीचे शेअर्स १९३७५ टक्के वाढले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने १८ सप्टेंबर २०२० रोजी आदित्य व्हिजनच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते आणि त्यांची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर १ लाख रुपयांना खरेदी केलेल्या शेअर्सचे मूल्य सध्या १.९५ कोटी रुपये झाले असते. आदित्य व्हिजन लिमिटेडचे मार्केट कॅप सोमवारी ६१७० कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.

कंपनीने शेअर्स १० तुकड्यांमध्ये विभागले मल्टीबॅगर कंपनी आदित्य व्हिजन लिमिटेडने त्यांचे शेअर्स (स्टॉक स्प्लिट) विभाजित केले आहेत. कंपनीने ऑगस्ट २०२४ मध्ये त्यांचे शेअर्स १० तुकड्यांमध्ये विभागले. आदित्य व्हिजन लिमिटेडने १० रुपयांच्या दर्शनी मूल्याचे शेअर्स १ रुपयांच्या दर्शनी मूल्याचे १० शेअर्समध्ये विभागले आहेत. गेल्या ४ वर्षांत आदित्य व्हिजन लिमिटेडच्या शेअर्समध्ये ५९५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. स्पेशॅलिटी रिटेल उद्योगाशी संबंधित कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या तीन वर्षांत २८७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर, दोन वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये १०९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूक