Join us

रॉकेट बनला 'या' कंपनीचा शेअर, 1 मिनिटात केली 200 कोटी रुपयांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 15:28 IST

आज बाजार सुरू होताच कंपनीच्या शेअरमध्ये 8.30 टक्के वाढ झाली.

चंद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगनंतर Aventel Limited चर्चेत आली आहे. चंद्रयान मोहिमेत या कंपनीचे कोणतेही योगदान नाही, तरीदेखील तेव्हापासून कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली होती. ही वाढ अजूनही सुरुच आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 40 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, तर गेल्या 5 ट्रेडिंग सत्रात कंपनीने 16 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली. विशेष म्हणजे, आज कंपनीचे शेअर्स अवघ्या एका मिनिटात 8 टक्क्यांहून अधिक वाढले, ज्यामुळे कंपनीला 200 कोटी रुपयांहून अधिक नफा झाला. 

कंपनीचे शेअर्स विक्रमी पातळीवरISRO च्या आदित्य-L1 मोहिमेत भूमिका बजावणारी Aventel Limited देशातील आघाडीची आयटी सोल्युशन्स आणि स्पेस टेक कंपनी आहे. आज कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ झाली. दुपारी 1:40 वाजता कंपनीचे शेअर्स 15 रुपयांच्या वाढीसह 332 रुपयांवर, म्हणजेच 4.75 टक्के वाढीवर व्यवहार करत आहेत. ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीच्या शेअर्सने 343.30 रुपयांची विक्रमी पातळी गाठली. आश्चर्याची बाब म्हणजे बाजार उघडल्यानंतर एका मिनिटातच कंपनीचा शेअर 8.30 टक्क्यांच्या वाढीसह 343.30 रुपयांवर पोहोचला होता. 

एका मिनिटात 200 कोटींहून अधिक कमाई या वाढीमुळे कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये प्रचंड वाढ झाली. कंपनीचे मार्केट कॅप एका दिवसापूर्वी 2580 कोटी रुपये होते. जे आज ट्रेडिंग सुरू झाल्याच्या एका मिनिटात 2794 कोटी रुपयांवर आले. त्यामुळे एका मिनिटात कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 214 कोटी रुपयांची वाढ दिसून आली. कंपनीच्या किरकोळ गुंतवणूकदारांनाही आज खूप फायदा झाला आहे.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक