Join us

फक्त 15 रुपयांच्या शेअरची कमाल, 1 लाखाचे केले 1 कोटी; एक्सपर्टचा अंदाज- ₹2500 वर जाणार भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 20:54 IST

सप्टेंबर 2022 च्या संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा 43 टक्क्यांनी वाढून 116 कोटींवर पोहोचला आहे. तर, सप्टेंबर 2021 च्या संपलेल्या तिमाहीत तो 81 कोटी रुपये एवढा होता.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून आपण कोट्यधीशही होऊ शकतात. फक्त, आपल्याकडे संयम असायला हवा. असाच एक शेअर म्हणजे, विनती ऑरगॅनिक्स लिमिटेडचा (Vinati Organics Ltd) आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. या मिडकॅप कंपनीच्या (Mid cap firm) शेअरने गेल्या 10 वर्षांत तब्बल 3,500 टक्क्यांहून अधिकची उसळी घेतली आहे. तसेच, या शेअरने गेल्या 13 वर्षांत 13,413.22% चा परतावा दिला आहे.

कंपनी नफ्यात - सप्टेंबर 2022 च्या संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा 43 टक्क्यांनी वाढून 116 कोटींवर पोहोचला आहे. तर, सप्टेंबर 2021 च्या संपलेल्या तिमाहीत तो 81 कोटी रुपये एवढा होता. तस, नेट सेल्स 51 टक्क्यांनी वाढून 566.29 कोटी रुपये झाला आहे. जी गेल्या वर्षीच्या सेम तिमाहीत 374 कोटी रुपये होती.

ब्रोकरेज म्हणतायत आणखी तेजी येणार - सप्टेंबर 2022 तिमाहीनंतर, या स्टॉकवर ब्रोकरेज बुलिश आहेत. शेअरखानने म्हटले आहे, की एटीबीएस/आयबीबी सेगमेंटमध्ये विनती ऑरगॅनिक्सची ग्लोबल मार्केट हिस्सेदारी, प्रोडक्ट्स पोर्टफोलियो, कॅपेसिटी विस्तार/नवे प्रोडक्ट लॉन्च आणि विशेषतः केमिकल सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यातीची संधी दीर्घकाळात लाभ होऊ शकतात. ब्रोकरेजने याचे टार्गेट 2,500 रुपये एवढे ठेवले आहे आणि यावर आपली 'बाय' रेटिंग दिली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक