Join us

Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 15:04 IST

Share Market Update: संमिश्र जागतिक वातावरणामुळे देशांतर्गत शेअर बाजारात आज घसरण दिसून येत आहे. दिवसभरात बीएसई सेन्सेक्स तब्बल ४७५ अंकांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५० निर्देशांक १५० अंकांनी घसरला.

Share Market Update: संमिश्र जागतिक वातावरणामुळे देशांतर्गत शेअर बाजारात आज घसरण दिसून येत आहे. दिवसभरात बीएसई सेन्सेक्स तब्बल ४७५ अंकांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५० निर्देशांक १५० अंकांनी घसरला. दुपारी २.१५ वाजता सेन्सेक्स ३९३.४४ अंकांनी म्हणजेच ०.४७ टक्क्यांनी घसरून ८३,३०३.८५ अंकांवर व्यवहार करत होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १२३.३५ अंकांनी घसरून २५,४१८.४५ अंकांवर व्यवहार करत होता. सेन्सेक्समध्ये भारती एअरटेल, एनटीपीसी, मारुती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट आणि सन फार्मा यांचे शेअर्स वधारले, तर बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह, इटर्नल, एल अँड टी, बीईएल, एचडीएफसी बँक यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत लवकरच व्यापार करार करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे आयटी शेअर्समध्ये तेजी आली आहे. निफ्टी आयटी निर्देशांक १.५ टक्क्यांनी वधारला आहे. परंतु अमेरिकेतील कमकुवत आर्थिक आकडेवारी आणि व्याजदर कपातीबाबत फेडच्या अध्यक्षांची भूमिका यामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत. निफ्टी मिडकॅप ०.०७ टक्क्यांनी वधारला आहे, तर निफ्टी स्मॉलकॅप ०.३ टक्क्यांनी घसरला आहे. निफ्टी फार्मा ०.२५ टक्क्यांनी वधारला. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक ०.३७ टक्के आणि निफ्टी रियल्टी १.०४ टक्क्यांनी घसरला.

अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई 

कोणत्या शेअर्समध्ये घसरण झाली?

कामकाजादरम्यान एशियन पेंट्समध्ये १ टक्क्यांची घसरण झाली. भारतीय स्पर्धा आयोगानं कंपनीविरोधात चौकशी सुरू केली आहे. आदित्य बिर्ला समूहाची कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीजनं एशियन पेंट्सविरोधात तक्रार दाखल केली होती. इंडसइंड बँकेचा शेअरही ३ टक्क्यांनी घसरला. जागतिक ब्रोकरेज कंपनी गोल्डमन सॅक्सनं बँकेचे शेअर रेटिंग 'सेल' केलं आहे. दरम्यान, पारस डिफेन्सच्या शेअरमध्येही ४ टक्क्यांची वाढ झाली आहे. फ्रान्सच्या एका कंपनीने पारस डिफेन्ससोबत २२ कोटी रुपयांचा करार केला आहे. गॅब्रिएल इंडियाच्या शेअरनं सलग दुसऱ्या दिवशी २० टक्क्यांचा उच्चांक गाठला.

टॅग्स :शेअर बाजार