Join us

Share Market IPO : गुंतवणूकदारांसाठी भीतीदायक स्वप्न ठरला ‘हा’ आयपीओ, पहिल्याच दिवशी लोअर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 15:02 IST

Uday Shiv Kumar Infra IPO : गुंतवणूकदारांना या आयपीओकडून अधिक अपेक्षा होत्या. पण या आयपीओनं अपेक्षाभंग केलाय.

उदय शिवकुमार इन्फ्रानं (Uday shivakumar Infra) सोमवारी शेअर बाजारात एन्ट्री घेतली आहे. कंपनीची शेअर बाजारातील सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. बीएसईवर कंपनीचं लिस्टिंग ३५ रुपयांवर झालं होतं. परंतु अवघ्या काही वेळात या शेअरला लोअर सर्किट लागलं. यानंतर हा शेअर घसरून ३३.३० रुपयांवर आपटला.

उदय शिवकुमार इन्फ्रा च्या IPO ला चांगला प्रतिसाद मिळाला होता. सबस्क्रिप्शनच्या तिसऱ्या दिवशी आयपीओ ३२.४९ पट सबस्क्राइब झाला. कंपनीचा IPO २० मार्च २०२३ रोजी उघडला. हा आयपीओ २३ मार्च २०२३ पर्यंत खुला होता. कंपनीच्या आयपीओची इश्यू प्राईज ३३ ते ३५ रुपये प्रति शेअर होती. २ कोटी शेअर्ससाठी ६१.२६ कोटी बोली मिळाल्या होत्या.

कंपनीला नॉन इन्स्टिट्युशनल कॅटेगरीत ६०.४२ पट बोली प्राप्त झाल्या. तर, क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स कॅटेगरीत ४०.४७ पट बोली मिळाल्या. या दोघांच्या तुलनेत रिटेल कॅटेगरीत घसरण दिसून आली होती. रिटेल सेगमेंटमध्ये IPO फक्त १४.१० पट सबस्क्राइब झाला. कंपनीनं आयपीओच्या माध्यमातून ६६ कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले होते.

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंग