Share Market Today: कमकुवत जागतिक संकेत आणि गुंतवणूकदारांच्या सावध भूमिकेमुळे भारतीय शेअर बाजारातील घसरणीचे सत्र सुरूच आहे. २१ जानेवारी रोजी बाजाराची सुरुवात रेड झोनमध्ये झाली आणि निफ्टी २५,२५० च्या महत्त्वाच्या पातळीच्या खाली आला. सकाळी ९:३० वाजेपर्यंत सेन्सेक्स १५० अंकांनी घसरून ८२,०३९ च्या पातळीवर आला, तर निफ्टी २५ अंकांच्या घसरणीसह २५,२०७ वर व्यवहार करत होता. या काळात निफ्टीमध्ये डॉ. रेड्डीज लॅब्स, ग्रासिम, कोल इंडिया, JSW स्टील आणि ONGC च्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर भारती एअरटेल, श्रीराम फायनान्स, अपोलो हॉस्पिटल्स, ICICI बँक आणि इन्फोसिसचे शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते.
महिन्याला ₹५०,००० पगार आहे, HDFC Bank मधून २० वर्षांसाठी तुम्हाला सर्वाधिक किती होमलोन मिळू शकतं?
१५ लाख कोटी रुपये स्वाहा
बाजारातील दबावाचा परिणाम कंपन्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशनवरही झाला. बीएसई (BSE) मध्ये लिस्टेड कंपन्यांचं एकूण बाजार भांडवल ४६८ लाख कोटी रुपयांवरून घसरून सुमारे ४५३ लाख कोटी रुपयांवर आलं. गुंतवणूकदारांसाठी हा सलग तीन दिवसांचा घसरणीचा काळ राहिला, ज्यामध्ये सुमारे १५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं.
आज या कंपन्यांचे निकाल जाहीर होणार
आज म्हणजेच २१ जानेवारी २०२६ रोजी अनेक मोठ्या कंपन्यांचे डिसेंबर तिमाहीचे (Q3 FY26) आर्थिक निकाल जाहीर होतील. यामध्ये डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, एटर्नल, बँक ऑफ इंडिया, कॅनरा एचएसबीसी लाईफ इन्शुरन्स, बजाज कन्झ्युमर केअर, दालमिया भारत, ईपॅक प्रीफॅब टेक्नॉलॉजीज, हिंदुस्थान पेट्रोलियम, जिंदाल स्टेनलेस, केईआय इंडस्ट्रीज, पीएनबी हाउसिंग फायनान्स, सुप्रीम इंडस्ट्रीज, टाटा कम्युनिकेशन्स, यूटीआय अॅसेट मॅनेजमेंट आणि वारी एनर्जीज यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या तिमाही कामगिरीवर गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.
Web Summary : Indian stock market continues to fall due to global cues. Sensex declined 150 points, Nifty below 25,250. Investors lost ₹15 lakh crore in three days. Key companies to release Q3 results today.
Web Summary : वैश्विक संकेतों से भारतीय शेयर बाजार में गिरावट जारी है। सेंसेक्स 150 अंक गिरा, निफ्टी 25,250 से नीचे। निवेशकों को तीन दिनों में ₹15 लाख करोड़ का नुकसान हुआ। आज प्रमुख कंपनियां Q3 के नतीजे जारी करेंगी।