Join us

Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 09:51 IST

Share Market Opening 18 July, 2025: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी, देशांतर्गत शेअर बाजारानं घसरणीसह व्यवहार सुरू केला. आज, बीएसई सेन्सेक्स ६५.६२ अंकांनी (०.०८%) घसरून ८२,१९३.६२ अंकांवर उघडला.

Share Market Opening 18 July, 2025: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी, देशांतर्गत शेअर बाजारानं घसरणीसह व्यवहार सुरू केला. आज, बीएसई सेन्सेक्स ६५.६२ अंकांनी (०.०८%) घसरून ८२,१९३.६२ अंकांवर उघडला. त्याचप्रमाणे, एनएसईचा निफ्टी ५० निर्देशांक देखील आज २.९० अंकांनी (०.०१%) किरकोळ घसरणीसह २५,१०८.५५ अंकांवर उघडला. दोन दिवसांच्या वाढीनंतर गुरुवारी बाजार पुन्हा एकदा घसरणीसह बंद झाला होता. काल, सेन्सेक्स ३७५.२४ अंकांच्या वाढीसह ८२,२५९.२४ वर बंद झाला आणि निफ्टी १००.६० अंकांच्या (०.४०%) घसरणीसह २५,१११.४५ वर बंद झाला.

अ‍ॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

शुक्रवारी, सेन्सेक्समधील ३० पैकी २० कंपन्यांचे शेअर्स वाढीसह ग्रीन झोनमध्ये उघडले आणि ९ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह रेड झोनमध्ये उघडले, तर टेक महिंद्राचे शेअर्स आज कोणत्याही बदलाशिवाय उघडले. दुसरीकडे, आज निफ्टी ५० मधील ५० कंपन्यांपैकी ३१ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह ग्रीन झोनमध्ये उघडले तर १८ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह रेड झोनमध्ये उघडले. आज निफ्टी ५० च्या एका कंपनीचे शेअर्स कोणत्याही बदलाशिवाय उघडले. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, टाटा स्टीलचे शेअर्स आज सर्वाधिक १.१९ टक्के वाढीसह उघडले आणि अ‍ॅक्सिस बँकेचे शेअर्स सर्वाधिक ४.५६ टक्के घसरण झाली.

तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख

या शेअर्समध्ये तेजी / घसरण

आज सेन्सेक्समधील इतर कंपन्यांमध्ये इन्फोसिसचे शेअर्स ०.५१ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज ०.३८, महिंद्रा अँड महिंद्रा ०.३१, अल्ट्राटेक सिमेंट ०.३०, टीसीएस ०.३०, एचडीएफसी बँक ०.३०, टाटा मोटर्स ०.२३, एल अँड टी ०.२०, आयटीसी ०.१९, आयसीआयसीआय बँक ०.१८, टायटन ०.१७, इटरनल ०.१७, सन फार्मा ०.१६, पॉवर ग्रिड ०.१२, एनटीपीसी ०.१२, बीईएल ०.०९, एशियन पेंट्स ०.०४, मारुती सुझुकी ०.०२ आणि हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर्स ०.०२ टक्क्यांनी वधारले.

दुसरीकडे, आज भारती एअरटेलचे शेअर्स १.०३, कोटक महिंद्रा बँक ०.५०, बजाज फायनान्स ०.३१, बजाज फिनसर्व्ह ०.१७, अदानी पोर्ट्स ०.१५, एचसीएल टेक ०.०५, ट्रेंट ०.०५ आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स ०.०१ टक्क्यांनी घसरले.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक