Join us

सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद; LIC वधारले, तर ITC ला फटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 16:31 IST

Share Market : सेन्सेक्स - निफ्टी घसरणीसह बंद झाला. निफ्टी बँक हिरव्या रंगात बंद झाला. एफएमसीजी, फार्मा आणि मेटल स्टॉकवर दबाव दिसून आला.

Share Market : आठवड्याच्या तिसऱ्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार आज एका विशिष्ट रेंजमध्ये व्यवहार करताना दिसला. दिवसभर चढ-उतारानंतर, बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. मात्र, मिडकॅप निर्देशांक स्थिर राहिला. क्षेत्रीय पातळीवर, संरक्षण आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक निर्देशांक किंचित वाढीसह बंद झाले, तर एफएमसीजी (FMCG), फार्मा आणि मेटल स्टॉकवर दबाव दिसून आला. निफ्टी आज २४,८०० च्या खाली बंद झाला.

बाजार कोणत्या पातळीवर बंद झाला?बुधवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर, निफ्टी ७४ अंकांनी घसरून २४,७५२ वर बंद झाला. दुसरीकडे, सेन्सेक्स २३९ अंकांनी घसरून ८१,३१२ वर स्थिरावला. निफ्टी बँक (Nifty Bank) मात्र ६४ अंकांनी वाढून ५५,४१७ वर बंद झाला, तर निफ्टी मिडकॅप निर्देशांक १३ अंकांच्या किरकोळ घसरणीनंतर ५७,१४१ वर बंद झाला.एकूणच, निफ्टीमधील ५० पैकी ३६ आणि सेन्सेक्समधील ३० पैकी १८ समभाग घसरणीसह बंद झाले. निफ्टी बँकेच्या १२ पैकी ६ समभागांमध्ये वाढ दिसून आली.

आज कोणत्या शेअर्समध्ये तेजी आणि कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

  • ITC: ब्रिटिश अमेरिकन टोबॅको (BAT) कंपनीने आज ITC मधील २.५% हिस्सा विकला, ज्यामुळे ब्लॉक डील झाली आणि त्यानंतर ITC चा शेअर ३% घसरणीसह बंद झाला.
  • NMDC: EBITDA (एबिटडा) आणि अंदाजापेक्षा कमी मार्जिनमुळे NMDC चे शेअर २% ने घसरले.
  • LIC: मार्च तिमाहीच्या दमदार निकालांनंतर, एलआयसीच्या  शेअरमध्ये आज ८% ची वाढ झाली, ही गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी ठरली.
  • ITI: निव्वळ तोटा कमी झाल्यानंतर आयटीआयच्या (ITI) शेअर्समध्ये तब्बल १०% वाढ झाली.
  • मेडप्लस (Medplus): या कंपनीच्या नफ्यात EBITDA मध्ये २८.८% वाढ आणि मार्जिनमध्ये ९% सुधारणा दिसून आल्याने, मेडप्लसचे शेअर २% वाढीसह बंद झाले.
  • श्री सिमेंट (Shree Cement): कंपनीला २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ५८९ कोटी रुपयांची कर मागणी सूचना मिळाल्याने, श्री सिमेंटचा शेअर ३% घसरून बंद झाला.
  • अपोलो मायक्रो (Apollo Micro): कंपनीला आज एक नवीन ऑर्डर मिळाल्यानंतर अपोलो मायक्रोमध्ये १३% वाढ दिसून आली.
  • त्रिवेणी इंजिनिअरिंग (Triveni Engineering): चौथ्या तिमाहीतील चांगल्या निकालांनंतर त्रिवेणी इंजिनिअरिंगचा शेअरही ९% वाढीसह बंद झाला.
  • भारत डायनॅमिक्स (Bharat Dynamics): नफा ६% घसरल्यानंतर भारत डायनॅमिक्सचे शेअर २% घसरले.
  • आरसीएफ (RCF): आरसीएफचा ईबीआयटीडीए ८.६०% पर्यंत घसरला आणि मार्जिनवरही दबाव आल्याने, स्टॉक २% ने घसरला.
  • DCX सिस्टीम्स (DCX Systems): आज DCX सिस्टीम्सचा शेअर ६% ने घसरून बंद झाला.
टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांकनिफ्टीगुंतवणूक