Join us

सेन्सेक्स पहिल्यांदा 80,000 पार; BSE मार्केट कॅप 447.43 लाख कोटींच्या पुढे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 16:35 IST

Share Market Today : आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2 लाख कोटींची वाढ झाली आहे.

Stock Market Closing On 4 July 2024 : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेला वाढीचा कल आजही( गुरुवार, 4 जुलै) कायम राहिला. बाजारातील ही वाढ आयटी आणि फार्मा शेअर्सच्या खरेदीमुळे झाली. आजच्या सत्रात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सच्या निर्देशांकातही वाढ झाली. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 63 अंकांच्या उसळीसह 80,049.67 अंकांवर बंद झाला. विशेष म्हणजे, सेन्सेक्स 80,000 च्या वर बंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 17.55 अंकांच्या वाढीसह 24,302 अंकांवर बंद झाला.

मार्केट कॅपमध्ये विक्रमी वाढभारतीय शेअर बाजाराच्या मार्केट कॅपमध्ये आजही मोठी वाढ झाली. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप 447.43 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 445.43 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच, आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2 लाख कोटींची वाढ झाली आहे.

वाढणारे आणि घसरणारे शेअर्सआजच्या व्यवहारात वाढलेल्या शेअर्समध्ये एचसीएल टेक 2.69%, आयसीआयसीआय बँक 2.54%, टाटा मोटर्स 2.40%, सन फार्मा 1.83%, टीसीएस 1.42%, इन्फोसिस 1.32%, कोटक महिंद्रा बँक 1.26%, महिंद्रा अँड महिंद्रा 0.41%, 0.40%, 0.40%. टक्के, NTPC 0.24 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर, एचडीएफसी बँक 2.36%, बजाज फायनान्स 1.97%, एल अँड टी 1.22%, टेक महिंद्रा 1.22%, अल्ट्राटेक सिमेंट 0.91% आणि टायटन .75 टक्क्यांनी घसरले.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक