Join us

बाजारात सकाळची आघाडी दुपारी तुटली! मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्ये पुन्हा घसरण, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 16:26 IST

Share Market: बाजारात चांगली सुरुवात झाल्यानंतर वरच्या पातळीवर दबाव दिसून आला. निफ्टी आणि सेन्सेक्स हिरव्या रंगात बंद झाले.

Share Market : शेअर बाजारात कधी काय होईल काही सांगता येत नाही. आज हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मंगळवारी शेअर बाजारात संमिश्र कल दिसून आला. सकाळी तेजीसह उघडलेला सेन्सेक्स दुपारी ७०० अकांनी घसरला. तरीही सेन्सेक्स आणि निफ्टी सलग ७ दिवस आघाडीवर राहिले. पण मिडकॅप आणि स्मॉल शेअर्समध्ये घसरण झाली. निफ्टी २३,६५० च्या वर तर सेन्सेक्स ७८,००० च्या वर राहिला. सेन्सेक्स ३३ अंकांच्या वाढीसह ७८,०१७ वर बंद झाला, तर निफ्टी १० अंकांनी वाढून २३,६६९ वर बंद झाला.

बाजारात आज कशी स्थिती होती?निफ्टी बँक ९७ अंकांनी घसरून ५१,६०८ वर बंद झाला. मिडकॅप निर्देशांकही ५५४ अंकांनी घसरून ५१,९७० वर आला. बाजारातील घसरणीचे मुख्य कारण म्हणजे मिडकॅप समभागांची खराब कामगिरी. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये एका शेअरमध्ये वाढ होण्याऐवजी ४ शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

या शेअर्समध्ये सर्वाधिक उसळीमंगळवारी सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ १० कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले. तर उर्वरित सर्व २० कंपन्यांचे समभाग तोट्यात बंद झाले. दुसरीकडे, निफ्टी ५० मधील ५० कंपन्यांपैकी केवळ १६ कंपन्यांचे समभाग वाढीसह हिरव्या चिन्हात बंद झाले आणि उर्वरित ३४ कंपन्यांचे समभाग तोट्यासह लाल चिन्हात बंद झाले. आज सेन्सेक्स कंपन्यांमध्ये अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स सर्वाधिक ३.३२ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले, तर झोमॅटोचे शेअर सर्वाधिक ५.५७ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये भयानक घसरणयाशिवाय आज बजाज फिनसर्व्हचे शेअर्स २.१६ टक्के, इन्फोसिस १.७१ टक्के, ॲक्सिस बँक १.२१ टक्के, भारती एअरटेल ०.९८ टक्के, एचडीएफसी बँक ०.९४ टक्के, एचसीएल टेकचे शेअर्स ०.९४ टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हर ०.३० टक्के, टीसीएस ०.२९ टक्के आणि एशियन पेंट्स ०.१४ टक्क्यांनी वधारले. दुसरीकडे, आज इंडसइंड बँकेचे समभाग ५.०९ टक्के, अदानी पोर्ट्स १.८९ टक्के, सन फार्मा १.४२ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा १.३९ टक्के, आयसीआयसीआय बँकेचे १.३४ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग १.२३ टक्क्यांनी, एसबीआय १.०७ टक्के, टाटा स्टील १.०४ टक्के, मारुती सुझुकी ०.९६ टक्के आणि पॉवरग्रिड ०.८४ टक्क्यांनी घसरले.

या सेक्टर्समध्ये वाढसिमेंट कंपन्यांची खरेदी वाढली. ब्रोकरेजने त्यांचे शेअर्स अपग्रेड केले आहेत. अल्ट्राटेक सिमेंट हा या क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढणारा स्टॉक होता. आयटी क्षेत्रातही वाढ दिसून आली. इन्फोसिस, पर्सिस्टंट सिस्टीम्स आणि कोफोर्ज सारख्या समभागांनी चांगली कामगिरी केली. बँकिंग क्षेत्रात एचडीएफसी बँक आणि ॲक्सिस बँकेने निफ्टी बँकेला आघाडी दिली. किरकोळ क्षेत्रात ट्रेंट आणि अव्हेन्यू सुपरमार्ट्सचे शेअर्स २% पेक्षा जास्त वाढले. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक