Join us
Daily Top 2Weekly Top 5

Share Market Today: शेअर बाजाराची संमिश्र सुरुवात, निफ्टी २५,७०० च्या वर; IT Stocks मध्ये प्रॉफिट बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 10:03 IST

Share Market Today: बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात संमिश्र झाली असून बाजार रेड आणि ग्रीन झोनमध्ये हेलकावे खाताना दिसला. सकाळी ९:२५ वाजता सेन्सेक्स ४२ अंकांच्या घसरणीसह ८३,४०८ वर व्यवहार करत होता.

Share Market Today: बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात संमिश्र झाली असून बाजार रेड आणि ग्रीन झोनमध्ये हेलकावे खाताना दिसला. सकाळी ९:२५ वाजता सेन्सेक्स ४२ अंकांच्या घसरणीसह ८३,४०८ वर व्यवहार करत होता, तर निफ्टी केवळ २ अंकांच्या घसरणीसह २५,७२१ च्या आसपास होता. बँक निफ्टीमध्येही ८ अंकांची किरकोळ घट होऊन तो ६१,१६५ च्या स्तरावर व्यवहार करत होता. एकूणच बाजार पूर्णपणे फ्लॅट ट्रेडिंगच्या मूडमध्ये असल्याचे दिसून आलं.

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

बाजार सपाट असला तरी ब्रॉडर मार्केटनं आज आपली वाढ टिकवून धरल्याचं पाहायला मिळालं. निफ्टी मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात ०.४ ते ०.५ टक्क्यांची तेजी होती, तर इंडिया विक्स (VIX) १.७ टक्क्यांनी खाली आला होता. आज मेटल शेअर्समध्ये चांगली उसळी दिसून आली असून हा निर्देशांक १ टक्क्यानं वधारला होता. याव्यतिरिक्त पीएसयू बँक, फार्मा, एफएमसीजी (FMCG) आणि हेल्थकेयर यांसारख्या निर्देशांकांमध्येही वाढ नोंदवण्यात आली.

स्टॉल लावण्यासाठी BMW मधून उतरतो; ₹२ प्लेटपासून 'दहीवड्या'ची झालेली सुरुवात; 'करोडपती चाट किंग'ची रंजक गोष्ट

आयटी शेअर्समध्ये नफा वसुली

आयटी शेअर्समध्ये आज गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्याचं दिसून आलं. यामध्ये इन्फोसिस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा हे निफ्टी ५० मधील टॉप लूजर्स ठरले. दुसरीकडे, बीईएल (BEL), इटर्नल, हिंदाल्को, टाटा स्टील, मॅक्स हेल्थकेअर आणि सिप्ला यांसारख्या शेअर्समध्ये तेजीचं वातावरण होतं.

जागतिक संकेतांचा प्रभाव

सकाळी गिफ्ट निफ्टी सुमारे ३० अंकांच्या वाढीसह २५,७७० च्या आसपास व्यवहार करत होता. काल अमेरिकन बाजारामध्ये मोठ्या चढ-उतारानंतर चांगली रिकवरी पाहायला मिळाली. डाओ जोन्स दिवसाच्या नीचांकी स्तरावरून ३५० अंकांनी सावरून ३० अंकांच्या वाढीसह बंद झाला, तर नॅस्डॅक देखील ३२५ अंकांच्या रिकवरीनंतर ३० अंकांनी वधारला. दरम्यान, आज जाहीर होणाऱ्या एफओएमसी मिनिट्सच्या पार्श्वभूमीवर डाओ फ्युचर्स सुमारे ५० अंकांनी खाली व्यवहार करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mixed start for share market; IT stocks see profit booking.

Web Summary : Indian share market saw a mixed start. Nifty above 25,700. IT stocks faced profit booking. Metal and PSU banks showed gains. Global cues mixed.
टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक