Share Market Opening 6 August, 2025: बुधवारी, पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारानं रेड झोनमध्ये व्यवहार सुरू केले. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, बीएसई सेन्सेक्स १५.२७ अंकांनी (०.०२%) घसरणीसह ८०,६९४.९८ अंकांवर व्यवहार सुरू केला. दुसरीकडे, एनएसई निफ्टी ५० निर्देशांक देखील आज ८.२० अंकांनी (०.०३%) घसरणीसह २४,६४१.३५ अंकांवर उघडला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादण्याची घोषणा केल्यापासून भारतीय बाजारात सतत घसरण होत आहे. मंगळवारी देखील बाजारानं रेड झोनमध्ये व्यवहार सुरू केला आणि शेवटी मोठ्या घसरणीसह बंद झाला.
बुधवारी, सेन्सेक्समधील ३० पैकी २० कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये वाढीसह उघडले आणि उर्वरित १० कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये घसरणीसह उघडले. दुसरीकडे, आज, निफ्टीमधील ५० कंपन्यांपैकी ३० कंपन्यांचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये वाढीसह उघडले आणि उर्वरित १९ कंपन्यांचे शेअर्स रेड झोनमध्ये घसरणीसह उघडले. तर एका कंपनीचा शेअर आज कोणताही बदल न होता उघडला. सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये, बीईएलचे शेअर्स आज सर्वाधिक १.४७ टक्के वाढीसह उघडले आणि इन्फोसिसचे शेअर्स आज सर्वाधिक ०.७० टक्के घसरणीसह उघडले.
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
या शेअर्समध्ये तेजी
आज सेन्सेक्समधील इतर कंपन्यांमध्ये भारती एअरटेलचे शेअर्स ०.९७ टक्के, पॉवर ग्रिड ०.५८, मारुती सुझुकी ०.५१, महिंद्रा अँड महिंद्रा ०.४६, बजाज फायनान्स ०.४५, एशियन पेंट्स ०.३४, ट्रेंट ०.३३, अदानी पोर्ट्स ०.३३, एल अँड टी ०.२५, आयसीआयसीआय बँक ०.२५, बजाज फिनसर्व्ह ०.२४, टायटन ०.२३, एनटीपीसी ०.१८, अॅक्सिस बँक ०.१८, कोटक महिंद्रा बँक ०.१६, आयटीसी ०.१३, हिंदुस्तान युनिलिव्हर ०.११, अल्ट्राटेक सिमेंट ०.१० आणि एसबीआयचे शेअर्स ०.०७ टक्क्यांनी वधारले.
या शेअर्समध्ये घसरण
दुसरीकडे, बुधवारी सन फार्माचे शेअर्स ०.५९, टेक महिंद्रा ०.३९, एचसीएल टेक ०.२८, एचडीएफसी बँक ०.१८, इटर्नल ०.१२, रिलायन्स इंडस्ट्रीज ०.१२, टाटा स्टील ०.०९, टाटा मोटर्स ०.०८ आणि टीसीएसचे शेअर्स ०.०८ टक्क्यांनी घसरून उघडले.