Join us

Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 09:47 IST

Share Market Today: बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारानं वाढीसह व्यवहार सुरू केला. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स १९८.०४ अंकांच्या वाढीसह ८१,५३५.९९ वर व्यवहार करत होता.

Share Market Today: बुधवारी देशांतर्गत शेअर बाजारानं वाढीसह व्यवहार सुरू केला. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स १९८.०४ अंकांच्या वाढीसह ८१,५३५.९९ वर व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे, एनएसईचा निफ्टी देखील ५३.४५ अंकांच्या वाढीसह २४,८७४.५५ च्या पातळीवर दिसून आला. आजच्या व्यवहारात, इंडिकुब स्पेसेस, जीएनजी इलेक्ट्रॉनिक्स, दिलीप बिल्डकॉन, जीएमआर एअरपोर्ट्स, आस्क ऑटोमोटिव्ह, जीई व्हर्नोव्हा टी अँड डी इंडिया, इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि लार्सन अँड टुब्रो सारखे शेअर्स फोकसमध्ये असतील. आज इंडिक्यूब स्पेसेस, जीएनजी इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्सची लिस्टिंग आहे.

कामकाजादरम्यान एल अँड टी, एशियन पेंट्स, अॅक्सिस बँक, जिओ फायनान्शिअल आणि बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर टाटा मोटर्स एसबीआय लाईफ, आयसीआयसीआय बँक, एसबीआयच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड

भारतीय बाजारात तेजी का?

जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक आघाड्यांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २०-२५ टक्के कर लादण्याची धमकी दिली आहे. त्याच वेळी, आयएमएफनं भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज वाढवला आहे. दरम्यान, बाजारात प्रॉफिट बुकिंग दिसून आलं, तर अनेक कंपन्यांचे निकाल आणि नवीन आयपीओ गुंतवणूकदारांच्या नजरेत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की भारतासोबतचा व्यापार करार अद्याप पूर्ण झालेला नाही आणि भारत आपल्या मित्र अमेरिकेवर सर्वाधिक कर लादतो. अशा परिस्थितीत त्यांनी भारतावर २०-२५ टक्के कर लादण्याचा इशारा दिला आहे. या विधानादरम्यान, अमेरिकन बाजारपेठेत प्रॉफिट बुकिंग दिसून आलं. डाऊ सुमारे २०० अंकांनी घसरून बंद झाला, परंतु इंट्राडेमध्ये एस अँड पी ५०० नं सलग सातव्या दिवशी आणि नॅस्डॅकनं सलग पाचव्या दिवशी आजवरचा उच्चांक गाठला.

टॅग्स :शेअर बाजारडोनाल्ड ट्रम्पगुंतवणूक