Join us

या ८ रुपयांच्या शेअरने ५ वर्षांत दिला १७०० टक्के परतावा, गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 17:12 IST

Share Market: शेअर बाजारात अनेक पेनी स्टॉक्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे.

Share Market: शेअर बाजाराबद्दल एक जुनी म्हण आहे की, येथे सर्वकाही शक्यतांचा खेळ आहे. जो जोखीम घेतो, तोच पुढे जातो. शेअर बाजारात अनेक पेनी स्टॉक्स आहेत, ज्यांनी गुंतवणूकदारांना अतिशय कमी कालावधीत मालामाल केले आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये गुरुवारीही मोठी वाढ झाली. शिक्षण क्षेत्रातील हा स्टॉक 'व्हिंटेज नॉलेज अकादमी लिमिटेडटचा आहे. 

पाच वर्षांत जबरदस्त परतावागेल्या पाच वर्षांत या स्टॉकने १७१३ टक्के जबरदस्त परतावा दिला आहे. पण, गेल्या वर्षभरात या स्टॉकमध्ये सुमारे २६ टक्क्यांनी घटही झाली आहे. या स्टॉकची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ७.०४ रुपये आहे, तर उच्च पातळी ९०.२३ रुपये आहे.

या कंपनीसोबत भागीदारीव्हिंटेज नॉलेज अकादमीने सायबर स्किलस्फीअर प्रायव्हेट लिमिटेडसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. ही कंपनी एआय, डिजिटल फॉरेन्सिक्स आणि सायबर सुरक्षेवर लक्ष केंद्रित करते. एका प्रेस रिलीज दरम्यान, अकादमीने म्हटले की, या भागीदारीचा उद्देश कुशल सायबर सुरक्षा व्यावसायिकांना प्रशिक्षण देणे आहे. या करारानुसार, व्हिंटेज नॉलेज अकादमी एकीकडे डिजिटल प्रणाली हाताळण्याची जबाबदारी घेईल आणि दुसरीकडे, विद्यार्थ्यांना कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याची पूर्ण जबाबदारी देखील तिच्याकडे असेल. 

व्हिंटेज अकादमी सायबर सुरक्षा व्यावसायिकांसाठी गट स्थापन करेल, तर संबंधित कार्यक्रमदेखील देशभरात त्यांच्याकडून आयोजित केले जातील. ते स्वतःच्या ऑनलाइन LMS प्लॅटफॉर्म www.vintagepro.app द्वारे प्रशिक्षण व्यवस्थापनाचे काम करेल. 

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक