Stock Market :शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांसाठी मागील आठवडा अतिशय चांगला ठरला. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE SENSEX) चा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1906.33 अंकांनी किंवा 2.38 टक्क्यांनी वाढला. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी (NSE NIFTI) 546.70 अंकांनी किंवा 2.26 टक्क्यांनी वाढला. या दरम्यान, सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे बाजारमूल्य 2 लाख कोटींहून अधिक वाढले. यामध्ये सर्वाधिक फायदा टाटा समूहाची कंपनी TCS ला झाला. कंपनीच्या गुंतवणूकदारांनी अवघ्या पाच दिवसांत 62,000 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.
टॉपच्या सहा कंपन्यांची बल्ले-बल्लेगेल्या आठवड्यात शेअर बाजारातील सेन्सेक्समधील टॉप 6 कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्य 2.03 लाख कोटी रुपयांनी वाढले. यादरम्यान, टाटाच्या TCS सोबतच खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या HDFC बँकेनेही मोठी कमाई केली. इतर कमाई करणाऱ्या कंपन्यांमध्ये मुकेश अंबानी यांच्या Reliance आणि एनआर नारायण मूर्ती यांच्या Infosys चाही समावेश होता.
TCS-HDFC आघाडीवर गेल्या आठवड्यात, TCS आणि HDFC बँका त्यांच्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पाडण्यात आघाडीवर होत्या. एकीकडे, IT दिग्गज TCS चे बाजार मूल्य 62,574.82 कोटी रुपयांनी वाढून 16,08,782.61 कोटी रुपयांवर पोहोचले. तर दुसरीकडे, HDFC बँकेचे मार्केट कॅप 14,19,270.28 कोटी रुपयांपर्यंत वाढले.
रिलायन्सने चांगली कमाई केलीTCS आणि HDFC बँक व्यतिरिक्त कमाईत पुढे असलेल्या कंपन्यांमध्ये, Infosys चे मार्केट कॅप (Infosys MCap) 26,885.8 कोटी रुपयांनी वाढून 7,98,560.13 कोटी रुपये झाले आहे, तर अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये (Reliance MCap) 26,185.14 कोटी रुपयांची वाढून 17,75,176.68 कोटी रुपये झाले. याशिवाय, SBI चे बाजार मूल्य (SBI MCap) 22,311.55 कोटी रुपयांनी वाढून 7,71,087.17 कोटी रुपये झाले.
(टीप- शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)