Join us

या ₹2 च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, खरेदीसाठी उडाली झुंबड; 24 जून ठरणार महत्वाचा दिवस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 17:19 IST

ही कंपनी इक्विटी शेअर जारी करून राइट्स इश्यूच्या माध्यमाने 48 कोटी रुपयांचा फंड उभारणार आहे.

शेअर बाजारातील श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेडचा शेअर आज 10% पर्यंत वधारून 2.09 रुपयांच्या इंट्रा डे हायवर पोहोचला. राइट्स इश्यूच्या रेकॉर्ड डेटसंदर्भातील एका अपडेटमुळे ही तेजी आल्याचे बोलले जात आहे. खरे तर, श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेडने 12:29 या रेशोमध्ये राइट्स इश्यू करण्यासाठी रेकॉर्ड डेट रिव्हाइज केली आहे. कंपनीने ही तारीख वाढवून शुक्रवार, 21 जून 2024 एवजी सोमवार, 24 जून, 2024 केली आहे.

जाणून घ्या डिटेल -ही कंपनी इक्विटी शेअर जारी करून राइट्स इश्यूच्या माध्यमाने 48 कोटी रुपयांचा फंड उभारणार आहे. विद्यमान शेअरधारक प्रत्येक 29 इक्विटी शेअर्ससाठी 12 राइट शेअर्सच्या पात्रता रेशोस  राइट्स इश्यूमध्ये भाग घेण्यास पात्र असतील. याचाच अर्थ 29 शेअरवर 12 नवे शेअर खरेदी करू शकतील. राइट्स इश्यू 4 जुलाई, 2024 ला सब्सक्रिप्शनसाठी खुला होईल आणि 18 जुलै, 2024 ला बंद होईल. जर हा राइट्स इश्यू पूर्णपणे सब्सक्राइब झाला, तर कंपनीचे थकबाकीदार इक्विटी शेअर 58 कोटी रुपयांवरून 82 कोटी रुपयांपर्यंत पोहोचतील.

अशी आहे शेअरची स्थिती - सध्या श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेडचा शेअर 1.90 रुपयांच्या गेल्या पातळीवरून 10 टक्क्यांनी वधारून 2.09 रुपयांवर पोहोचला आहे. या शेअरचा 52-आठवड्यांचा उच्चांक 2.17 रुपये आहे. तर नीचांक 1 रुपये आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :व्यवसायगुंतवणूकपैसा