Join us

Share Market : मंथली F&O एक्सपायरीच्या दिवशी सेन्सेक्स २५६ अंकांनी घसरला, निफ्टी १९३०० च्या खाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 16:57 IST

देशांतर्गत शेअर बाजारात सुरू असलेली वाढ गुरुवारी अखेर थांबली.

देशांतर्गत शेअर बाजारात सुरू असलेली वाढ गुरुवारी अखेर थांबली. ऑगस्टच्या फ्युचर अँड ऑप्शन एक्सपायरीच्या दिवशी बीएसई सेन्सेक्स 255.84 अंकांनी किंवा 0.39 टक्क्यांनी घसरून 64,831.41 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे, एनएसई निफ्टी 62.80 अंकांनी किंवा 0.32 टक्क्यांनी घसरून 19,284.65 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्ये अदानी एंटरप्रायझेस, बीपीसीएल, अदानी पोर्ट्स, आयशर मोटर्स आणि ब्रिटानिया यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. त्याचवेळी मारुती सुझुकी, सिप्ला, एचडीएफसी लाईफ, टायटन आणि हिंदाल्को या कंपन्यांच्या शेअर्समध्येही उसळी पाहायला मिळाली.क्षेत्रीय निर्देशांकाबद्दल सांगायचं झालं ऑईल आणि गॅस, पॉवर, एफएमजीसी आणि बँक निर्देशांक 0.4-1.3 टक्क्यांपर्यंत घसरले. त्याच वेळी, रिअल इस्टेट, मेटल, कॅपिटल गुड्स, आयटीमध्ये 0.3-1 टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवण्यात आली.हे शेअर्स घसरलेएशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 1.33 टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, एसबीआय, बजाज फायनान्स आणि नेस्ले इंडियाचे शेअर्स एक टक्क्याहून अधिक घसरणीसह बंद झाले. याशिवाय बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, जेएसडब्ल्यू स्टील, पॉवरग्रिड, आयटीसी, एनटीपीसी, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक आणि सन फार्मा यांचे शेअर्सही घसरणीसह बंद झाले.

या शेअर्समध्ये तेजीसेन्सेक्समध्ये मारुतीचा शेअर सर्वाधिक 2.22 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक आणि जिओ फायनान्शियलचे शेअर्स वाढीसह बंद झाले.

टॅग्स :शेअर बाजार