Stock Market :शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांची सध्या झोप उडाली आहे. काही दिवसांपासून शेअर बाजारात मंदीचे सावट आहे. गेल्या ६ महिन्यांत BSE सेन्सेक्स ५ टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या ८ महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर या काळात शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे ७७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष बाब म्हणजे BSE ५०० मध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक चारपैकी ३ शेअर्स मंदीत आहेत. किमान १० कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून ५० टक्क्यांनी घसरले आहेत. ज्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे, त्यात अदानी पॉवर लिमिटेड आणि येस बँक लिमिटेड सारख्या शेअर्सचा समावेश आहे. जे किरकोळ गुंतवणूकदारांच्या पसंतीचे आहेत. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदार चिंतेत आहेत.
५०० पैकी ३७१ शेअर्स, म्हणजे ७४% त्यांच्या एक वर्षाच्या उच्चांकावरून २०% किंवा त्याहून अधिक घसरले आहेत. BSE वर सूचीबद्ध सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आता ४.८१ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे, जे १३ मे २०२४ नंतरचे सर्वात कमी स्तर आहे. बाजारात आणखी करेक्शन होण्याची शक्यता बाजार तज्ज्ञ नाकारत नाहीत. मिड कॅप सोडा लार्ज कॅप स्टॉक्स देखील यातून सुटले नाहीतय
या शेअर्समध्ये मोठी घसरणसन फार्मा ॲडव्हान्स्ड रिसर्च कंपनीचे शेअर्स एप्रिल २०२४ मध्ये ४७४ रुपयांच्या उच्चांकावरून ६३% घसरून १७४.५५ रुपयांवर आले आहेत. कंपनी अनेक तिमाहीपासून तोटा नोंदवत आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे शेअर्स जून २०२४ मध्ये २,१७३.६५ रुपयांच्या उच्चांकावरून ५९% घसरून ८८९.९० रुपयांवर आले आहेत. होनसा कन्झुमर लिमिटेडचे शेअर्स ५६% ने घसरले आहेत.
अदानी पॉवर लिमिटेड, स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी लिमिटेड, आरबीएल बँक लिमिटेड, एमएमटीसी लिमिटेड, अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड, आलोक इंडस्ट्रीज लिमिटेड, तन्ला प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आणि इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड देखील त्यांच्या एका वर्षाच्या उच्चांकापेक्षा ४८-४९ टक्क्यांनी खाली व्यवहार करत आहेत. गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड, हिंदुस्तान झिंक लिमिटेड, येस बँक लिमिटेड, इझी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेड आणि अदानी टोटल गॅस लिमिटेड हे देखील ५२ आठवड्यांच्या उच्चांकावरून ४७-४८ टक्क्यांनी घसरले आहेत.
पुढे काय होईलशेअर बाजाराच्या ताज्या समीकरणावर नजर टाकली तर सध्या लवकर रिकव्हरीची आशा नाही. अमेरिकेने रशियावर नवे निर्बंध लादले असून ट्रम्प यांच्या आगमनाने पुन्हा एकदा टॅरिफ वॉरला बळ मिळताना दिसत आहे. या सगळ्याचा परिणाम जागतिक व्यापारावर दिसून येणार असून त्याचा थेट फटका शेअर बाजाराला बसणार आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने एका नोटमध्ये म्हटले आहे की येत्या काही महिन्यांत लार्ज-कॅप शेअर्स अधिक चांगली कामगिरी करू शकतात, तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये सुधारणा सुरू राहू शकते.