Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 573 च्या वाढीसह 85,762 अंकांवर, तर निफ्टी 26,300 पार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:12 IST

Share Market Rise: या तेजीचा फायदा मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सना झाला.

Share Market Rise: आज (2 जानेवारी) आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. जागतिक बाजारांकडून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आणि लार्जकॅप शेअर्समध्ये पुन्हा खरेदी वाढल्याने BSE Sensex आणि Nifty 50 दोन्ही निर्देशांक हिरव्या निशाणावर व्यवहार करताना दिसले. आजच्या व्यवहाराअंती सेन्सेक्स 0.67 टक्क्यांनी किंवा 573.41 अंकांनी वाढून 85,762.01 अंकांवर पोहोचला, तर निफ्टी 0.70 किंवा 182 अंकांच्या वाढीसह 26,328 वर पोहोचला.

मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी

या तेजीचा फायदा मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सनाही झाला. Bombay Stock Exchange चे मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.72 टक्क्यांपर्यंत वाढले. FMCG वगळता जवळपास सर्व प्रमुख सेक्टोरल निर्देशांक हिरव्या निशाणावर होते. युटिलिटी, ऑटो, पॉवर, PSU बँक आणि मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी पाहायला मिळाली. 

आजच्या तेजीमागील 5 प्रमुख कारणे

जागतिक बाजारांकडून सकारात्मक संकेत

एशियाई बाजारांत दक्षिण कोरियाचा कोस्पी, शांघायचा SSE कंपोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक वाढीसह व्यवहार करत होते. याशिवाय, अमेरिकन फ्युचर्सही सुमारे 0.7 टक्क्यांनी वधारले, त्यामुळे वॉल स्ट्रीटवर चांगल्या सुरुवातीची अपेक्षा निर्माण झाली.

लार्जकॅप शेअर्समध्ये पुन्हा खरेदी

शुक्रवारी लार्जकॅप शेअर्समध्ये खरेदी वाढलेली दिसली. विशेषतः Reliance Industries चे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशी जवळपास 1 टक्क्यांनी वाढले. इक्विनॉमिक्स रिसर्चचे संस्थापक जी. चोकलिंगम यांनी सांगितले की, ऑटो कंपन्यांचे मासिक विक्री आकडे आणि इतर सेक्टर्समधील बिझनेस अपडेट्स डिसेंबर तिमाहीतील नफ्यात सुधारणा दर्शवत आहेत.

देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांची खरेदी

देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (DIIs) सुरू असलेल्या खरेदीमुळे बाजाराला मोठा आधार मिळाला. एनरिच मनीचे CEO पोनमुदी आर. यांच्या मते, देशांतर्गत गुंतवणुकीमुळे परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा परिणाम काही प्रमाणात कमी झाला आहे.

रुपयांत मजबुती

चलन बाजारात भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 6 पैशांनी मजबूत होऊन 89.92 वर पोहोचला. बाजार तज्ज्ञांच्या मते, Reserve Bank of India 90 चा स्तर सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे.

ऑटो शेअर्समध्ये जोरदार तेजी

डिसेंबर महिन्याचे विक्री आकडे जाहीर झाल्यानंतर ऑटो शेअर्समध्ये मोठी तेजी दिसली. निफ्टी ऑटो निर्देशांक जवळपास 1 टक्क्यांनी वाढला असून सलग चौथ्या दिवशी तो वाढीमध्ये आहे. जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही. के. विजयकुमार यांच्या मते, डिसेंबरमध्ये पॅसेंजर वाहन विक्रीत वर्षभरात 25.8 टक्क्यांची वाढ ही ऑटो क्षेत्रासाठी सकारात्मक बाब आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

English
हिंदी सारांश
Web Title : Stock Market Surges: Sensex at 85,762, Nifty Crosses 26,300

Web Summary : Indian stock markets soared, driven by positive global cues and renewed buying in large-cap shares. Sensex closed at 85,762.01 and Nifty at 26,328. Midcap and smallcap stocks also benefited. Auto stocks witnessed strong gains due to encouraging sales figures.
टॅग्स :शेअर बाजारस्टॉक मार्केटगुंतवणूक