Join us

रेखा झुनझुनवालांकडे 'या' कंपनीचे 3 कोटी शेअर, एक्सपर्ट म्हणतायत ₹250 वर पोहोचणार भाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 23:48 IST

दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे सप्टेंबर 2024 तिमाहीच्या अखेरीस या खाजगी बँकेचे 3,45,30,060 शेअर्स किंवा 1.42 टक्के हिस्सेदारी होती.

शेअर बाजारातील फेडरल बँकेच्या शेअरने गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांक गाठला. बीएसईवर, या शेअरने गेल्या 215.30 रुपयांच्या बंदच्या तुलनेत 216.90 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला. हा शेअर मंगळवारी 216.20 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे सप्टेंबर 2024 तिमाहीच्या अखेरीस या खाजगी बँकेचे 3,45,30,060 शेअर्स किंवा 1.42 टक्के हिस्सेदारी होती.

बँकेचे मार्केट कॅप गुरुवारी 52,826 कोटी रुपये एवढे होते. बँकिंग स्टॉकचा एका वर्षाचा बीटा 0.9 आहे, जो या कालावधीत सरासरी अस्थिरता दर्शवतो. बीएसईवर बँकेच्या एकूण 1.36 लाख शेअर्समध्ये 2.92 कोटी रुपयांचा व्यवहार झाला. तांत्रिकदृष्ट्या, स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) 65.6 वर आहे, जो स्टॉक ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये व्यवहार करतोय, ना ओव्हरबॉट झोनमध्ये व्यवहार करतोय, असे दर्शवतो. फेडरल बँकेचा शेअर 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग अॅव्हरेजच्या वर व्यवहार  करत आहेत.

काय म्हणतायत ब्रोकरेज -सेंट्रम ब्रोकिंगने स्टॉकवर 250 रुपयांच्या टार्गेट प्राइससह खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज नुवामाने या शेअरसाठी 235 रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. आनंद राठीचे व्यवस्थापक जिगर एस पटेल यांच्या मते, "समर्थन 210 रुपये आणि रेझिस्टन्स 217 रुपये असेल. 217 रुपयांच्या वर 222 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. अल्पावधीत अपेक्षित ट्रेडिंग रेंज 210 रुपये ते 222 रुपयांदरम्यान असेल."

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

टॅग्स :रेखा झुनझुनवालाशेअर बाजारगुंतवणूक