Share Market Opening : भारतीय शेअर बाजारात सोमवारी (६ जानेवारी) किरकोळ तेजीसह व्यवहार सुरू झाले. सेन्सेक्स १३३ अंकांच्या वाढीसह ७९,३७६ वर व्यवहार करत होता. निफ्टी ४० अंकांच्या वाढीसह २४,०४५ च्या आसपास होता. कामकाजादरम्यान यात चढ-उतार दिसून आले. तर दुसरीकडे बँक निफ्टी ग्रीन आणि रेड झोनमध्ये व्यवहार करताना दिसला. निर्देशांक ५१,०११ च्या आसपास होता. निफ्टी मिडकप १८० अंकांनी वधारला. एनबीएफसी, रियल्टी आणि आयटी शेअर्समधील तेजीचा बाजाराला आधार मिळाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!https://www.whatsapp.com/channel/0029VaBACbfInlqHyOB7FE09
मात्र, काही काळानंतर बाजार सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरल्याचे दिसून आलं. निफ्टी ३५ अंकांनी घसरून २४,००० च्या खाली आला. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही विक्री दिसून आली. निफ्टीवर बजाज फायनान्स, टायटन, बजाज फिनसर्व्ह, ब्रिटानिया, भारती एअरटेल या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. तर, कोटक बँक, सिप्ला, टाटा कन्झ्युमर, बीईएल, जेएसडब्ल्यू स्टीलमध्ये घसरण झाली.
सकाळी जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळाले. अमेरिकेच्या बाजारात शुक्रवारी चांगली वाढ दिसून आली. पण आज सकाळी आशियाई बाजारातून संमिश्र संकेत मिळाले. गिफ्ट निफ्टी ५० अंकांच्या वाढीसह २४,१०० च्या वर व्यवहार करत होता. अमेरिकेच्या फ्युचर्समध्ये घसरण होत होती. त्यातच शुक्रवारी एफआयआयकडून पुन्हा विक्री झाली. शुक्रवारच्या घसरणीत एफआयआयची जोरदार विक्री झाली. कॅश, शेअर्स आणि इंडेक्स फ्युचर्स मध्ये ७,५७५ कोटी रुपयांची विक्री झाली.
टेक शेअर्सच्या जोरावर अमेरिकी बाजार शुक्रवारी पुन्हा चमकताना दिसला. डाऊ आणि नॅसडॅक ३४० अंकांनी वधारून बंद झाले आणि गेल्या आठवड्यातील घसरणीला ब्रेक लागला.