Join us

ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम; शेअर बाजाराची सपाट सुरुवात; 'या' स्टॉक्समध्ये जोरदार घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 10:41 IST

Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा विपरित परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसत आहे. मंगळवारी बाजाराची सुरुवात सपाट झाली.

Share Market : भारतीय शेअर बाजारातीलगुंतवणूकदारांची दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती झाली आहे. म्हणजे ऑक्टोबर २०२४ पासून सातत्याने घसरणाऱ्या बाजारात आता ट्रम्प यांच्या निर्णयांनी भर घातली आहे. आजही शेअर बाजाराची सुरुवात पूर्णपणे सपाट झाली. आठवड्याच्या दुसऱ्या सत्रात, सेन्सेक्स ८.१७ अंकांच्या किंचित वाढीसह ७७,३१९.९७ च्या पातळीवर उघडला. निफ्टी १६.४० अंकांनी घसरून २३,३६५.२० वर उघडला. त्याच वेळी, निफ्टी बँक ११९.३० घसरुन ४९,८६१.७० च्या पातळीवर उघडला. काल मेटल शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. आज काय परिस्थिती आहे?

झोमॅटोच्या शेअर्समध्ये मोठी घसरणमंगळवारी सेन्सेक्समधील 30 पैकी 12 कंपन्यांचे समभाग वाढीसह हिरव्या रंगात व्यवहार करत होते, तर उर्वरित 18 कंपन्यांचे समभाग घसरणीसह लाल रंगात होते. त्याचप्रमाणे निफ्टी ५० मधील ५० पैकी २० कंपन्यांचे समभाग वाढीसह हिरव्या चिन्हात तर उर्वरित ३० कंपन्यांचे समभाग नुकसानासह लाल चिन्हात व्यवहार करत होते. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, इन्फोसिसचे शेअर्स सर्वाधिक ०.८६ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते, तर झोमॅटोचे शेअर्स सर्वाधिक २.२५ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते.

कोणत्या क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ?सेन्सेक्स कंपन्यांमध्ये एचसीएल टेक ०.५९ टक्के, मारुती सुझुकी ०.४९ टक्के, आयटीसी ०.३७ टक्के, ॲक्सिस बँक ०.३२ टक्के, नेस्ले इंडिया ०.२६ टक्के, एशियन पेंट्स ०.२६ टक्के, इंडसइंड बँक ०.२० टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हर ०.१७ टक्के, बजाज फायनान्सचे शेअर्स ०.१७ टक्के, भारती एअरटेलचे ०.१४ टक्के आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स ०.१३ टक्क्यांनी वधारले.

या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरणआज पॉवर ग्रिड १.६९ टक्के, टाटा मोटर्स १.३० टक्के, अल्ट्राटेक सिमेंट १.०६ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ०.८८ टक्के, एनटीपीसी ०.८५ टक्के, एचडीएफसी बँक ०.८० टक्के, सन फार्मा ०.७३ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.७२ टक्के, स्टेट बँकेचे ०.६७ टक्के, टायटन ०.६४ टक्के, टाटा स्टील ०.५२ टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.४२ टक्के, अदानी पोर्ट्स ०.३२ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.३२ टक्के, टीसीएस ०.३२ टक्के, लार्सन अँड टुब्रो ०.१ टक्के आणि महिंद्राचे शेअर ०.४ टक्क्यांनी लाल रंगात व्यवहार करत होते.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारनिर्देशांकगुंतवणूकडोनाल्ड ट्रम्प