Join us

Share Market Opening : शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex मध्ये ८०० अंकांची घसरण; Nifty २३,२०० च्या खाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 09:36 IST

Share Market Opening : देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारी (१३ जानेवारी) मोठ्या घसरणीसह ट्रेडिंगची सुरुवात झाली. सेन्सेक्स जवळपास ८०० अंकांनी घसरला.

Share Market Opening : देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारी (१३ जानेवारी) मोठ्या घसरणीसह ट्रेडिंगची सुरुवात झाली. सेन्सेक्स जवळपास ८०० अंकांनी घसरला. निफ्टीही २२५ अंकांच्या घसरणीसह उघडला. बँक निफ्टी ४६० अंकांनी घसरला. मागील बंदच्या तुलनेत सेन्सेक्स ७४९ अंकांनी घसरून ७६,६२९ वर खुला झाला. निफ्टी २३६ अंकांनी घसरून २३,१९५ वर आला. तर दुसरीकडे बँक निफ्टी ४७० अंकांच्या घसरणीसह ४८,२६४ वर उघडला आणि चलन बाजारात रुपया २४ पैशांनी घसरून ८२.२१ रुपये प्रति डॉलरवर उघडला, जो त्याचा नवीन विक्रमी नीचांकी स्तर आहे.

जागतिक बाजार आणि गिफ्ट निफ्टीमध्ये सकाळी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण होऊन व्यवहार सुरू होण्याचे संकेत देत होते. शुक्रवारी अमेरिकी बाजारात मोठी घसरण झाली. आज सकाळी गिफ्ट निफ्टी १८८ अंकांनी घसरला होता. अशा परिस्थितीत संस्थात्मक गुंतवणूकदारही उदासीन असल्याचं दिसून येत आहे. शुक्रवारच्या घसरणीत एफआयआयने कॅश, इंडेक्स आणि शेअर फ्युचर्स सह ७१०० कोटी रुपयांहून अधिकची विक्री केली होती, तर देशांतर्गत फंडांनी सलग १८ व्या दिवशी सुमारे ४००० कोटी रुपयांची खरेदी केली. प्री-ओपनिंगमध्ये मोठी घसरण होऊन ओपनिंग होण्याची चिन्हे दिसत होती.

ग्लोबल मार्केट्सचे अपडेट्स

रोजगाराच्या चांगल्या आकडेवारीनंतर व्याजदर कपातीच्या आशा फोल ठरल्यानं शुक्रवारी अमेरिकी बाजारात घसरण झाली. डाऊ जवळपास ७०० अंकांनी घसरला तेव्हा नॅसडॅक ३२० अंकांनी घसरला. गिफ्ट निफ्टी १८८ अंकांनी घसरून २३३१२ वर आला. डाऊ फ्युचर्स फ्लॅट राहिला. तर दुसरीकडे जपानच्या बाजारपेठांमध्ये आज सुट्टी आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक