Join us

Share Market Today : शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स वधारला; ऑईल अँड गॅस, मेटल सेक्टमध्ये खरेदीचं सत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 10:06 IST

Share Market Today : शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात गुरुवारी सकारात्मक झाली आणि निफ्टी ५० अंकांनी वधारून २५२५० च्या पातळीवर उघडला. सेन्सेक्सही ११४ अंकांच्या वाढीसह ८२४७० च्या पातळीवर उघडला.

Share Market Today : शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात गुरुवारी सकारात्मक झाली आणि निफ्टी ५० अंकांनी वधारून २५२५० च्या पातळीवर उघडला. सेन्सेक्सही ११४ अंकांच्या वाढीसह ८२४७० च्या पातळीवर उघडला. बाजारातील बुधवारच्या करेक्शननंतर शेअर स्पेसिफिक अॅक्शनमध्ये वाढ झाली आहे.

सुरुवातीच्या व्यवहारात ऑईल अँड गॅस, मेटल क्षेत्रात खरेदी दिसून येत आहे. अल्ट्राटेक सिमेंट, श्रीराम फायनान्स, टाटा स्टील, आयटीसी आणि विप्रो या कंपन्यांचं शेअर्स निफ्टी ५० निर्देशांकात सर्वाधिक वधारले, तर एचडीएफसी लाइफ, नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, एसबीआय लाइफ या सारख्या शेअर्सवर निफ्टी ५० निर्देशांकात विक्रीचा दबाव दिसून आला.

गेल्या दोन आठवड्यांतील तेजीनंतर जागतिक चिंतेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी भारतीय शेअर बाजार किरकोळ घसरणीसह बंद झाला. मात्र, खालच्या पातळीवर खरेदी झाल्यानं जागतिक अस्थिरतेला सामोरं जाण्यासाठी देशांतर्गत शेअर बाजारांची लवचिकता दिसून येते, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक