Join us

ग्रीन झोनमध्ये शेअर बाजाराची कामकाजास सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह 'हे' शेअर्स उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 10:20 IST

Share Market Opening 11 August, 2025: देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात आज ग्रीन झोनमध्ये झाली. यासह सलग ४ दिवस भारतीय बाजारात झालेली सुरुवातीची घसरणही थांबली.

Share Market Opening 11 August, 2025: देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात आज ग्रीन झोनमध्ये झाली. यासह सलग ४ दिवस भारतीय बाजारात झालेली सुरुवातीची घसरणही थांबली. सोमवारी बीएसई सेन्सेक्स २७.५७ अंकांच्या (०.०३%) किंचित वाढीसह ७९,८८५.३६ अंकांवर उघडला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५० निर्देशांकही ८.२० अंकांच्या किरकोळ वाढीसह २४,३७१.५० अंकांवर व्यवहार करू लागला. गेल्या आठवड्यात बाजारानं रेड झोनमध्ये व्यवहार केला होता. शुक्रवारी सेन्सेक्स १४५.२५ अंकांनी घसरून ८०,४७८.०१ अंकांवर तर निफ्टी ५१.९० अंकांनी घसरून २४,५४४.२५ अंकांवर बंद झाला.

एसबीआयने केली जबरदस्त सुरुवात

सोमवारी सेन्सेक्सच्या ३० पैकी १८ कंपन्यांचे शेअर्स तेजीसह ग्रीन झोनमझध्ये उघडले आणि उर्वरित ११ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल चिन्हात उघडले, तर टाटा स्टीलचे समभाग आज कोणताही बदल न करता उघडले. दुसरीकडे निफ्टी ५० कंपनीच्या ५० पैकी ३४ शेअर्सनी तेजीसह व्यवहार करण्यास सुरुवात केली आणि उर्वरित १६ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह रेड झोनवर उघडले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर

या शेअर्समध्ये तेजी/घसरण

आज सेन्सेक्समधील इतर कंपन्यांमध्ये, एनटीपीसीचे शेअर्स १.०२ टक्के, ट्रेंट ०.९४ टक्के, बजाज फायनान्स ०.६७ टक्के, टायटन ०.५० टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.४२ टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.२८ टक्के, एचडीएफसी बँक ०.२६ टक्के, एल अँड टी ०.२५ टक्के, पॉवरग्रिड ०.१६ टक्के, टाटा मोटर्स ०.१४ टक्के, सन फार्मा ०.१४ टक्के, आयटीसी ०.१४ टक्के, इन्फोसिस ०.१४ टक्के, इटर्नल ०.१२ टक्के, मारुती सुझुकी ०.११ टक्के, अ‍ॅक्सिस बँक ०.०८ टक्के आणि टेक महिंद्राचे शेअर्स ०.०७ टक्क्यांनी वधारले.

दुसरीकडे, सोमवारी एशियन पेंट्सचे शेअर्स ०.६६ टक्के, अदानी पोर्ट्स ०.५७ टक्के, एचसीएल टेक ०.४९ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.३८ टक्के, हिंदुस्तान युनिलिव्हर ०.३८ टक्के, बीईएल ०.३६ टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज ०.२९ टक्के, भारती एअरटेल ०.१३ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ०.११ टक्के आणि टीसीएसचे शेअर्स ०.०१ टक्क्यांनी घसरले.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक