Join us

Share Market Today : अमेरिकेच्या फेडरल बँकेच्या बैठकीचा शेअर बाजारावर दबाव; अनेक मोठे शेअर्स रेड झोनमध्ये, कुठे झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 10:08 IST

share market : निफ्टी पॅक शेअर्समध्ये अपोलो हॉस्पिटल्स, टेक महिंद्रा आणि नेस्ले इंडियामध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. यूएस सेंट्रल बँक फेडरलच्या बैठकीचा दबाव शेअर मार्केटवर दिसून येत आहे.

share market : अमेरिकीची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराच्या निर्णयापूर्वी बुधवारी भारतीय शेअर बाजार लाल चिन्हावर उघडला. यूएस सेंट्रल बँक फेडरल बँकेच्या २ दिवसीय बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. आज रात्री फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल व्याजदरांबाबत त्यांचा निर्णय जाहीर करतील. व्याजदर ०.२५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सावध पावलं टाकत आहेत.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज घसरणीसह ८०,६६६.२६ अंकांवर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात तो ६७ अंकांनी घसरून ८०,६१६ वर व्यवहार करत होता. सुरुवातीच्या व्यवहारात, सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी १३ शेअर्स हिरव्या रंगात आणि १७ शेअर्स लाल रंगात उघडले. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी सुरुवातीच्या व्यवहारात ३४ अंकांनी घसरून २४,३०१ वर व्यवहार करताना दिसला. सुरुवातीच्या व्यवहारात, निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २० शेअर्स हिरव्या रंगात आणि ३० शेअर्स लाल रंगात व्यवहार करताना दिसले.

निफ्टी शेअर्सची स्थितीनिफ्टी पॅक शेअर्समध्ये अपोलो हॉस्पिटल्स, टेक महिंद्रा आणि नेस्ले इंडियामध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. त्याच वेळी, पॉवर ग्रिड, बीपीसीएल, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील आणि ट्रेंटमध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली.

सेक्टोरल निर्देशांकांची स्थितीक्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे झाल्यास, निफ्टी मीडियामध्ये सर्वाधिक ०.८१ टक्क्यांनी घसरण दिसून आली. याशिवाय निफ्टी पीएसयू बँक ०.३३ टक्के, निफ्टी प्रायव्हेट बँक ०.०३ टक्के, निफ्टी रियल्टी ०.३८ टक्के, निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्स ०.०४ टक्के, निफ्टी ऑइल अँड गॅस ०.१६ टक्के, निफ्टी मिडस्मॉल फायनान्शियल सर्व्हिसेस ०.०२ टक्के, निफ्टी बँक ०.११ टक्के, निफ्टी ऑटो ०.४३ टक्के आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस ०.०१ टक्क्यांनी घसरले. याशिवाय निफ्टी एफएमसीजीमध्ये ०.२९ टक्के, निफ्टी आयटीमध्ये ०.४३ टक्के, निफ्टी फार्मामध्ये ०.९१ टक्के, निफ्टी हेल्थकेअर इंडेक्समध्ये ०.६६ टक्के आणि निफ्टी मिडस्मॉल हेल्थकेअरमध्ये ०.१२ टक्के वाढ दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकअमेरिका