Join us

Stock Market News: पुन्हा एकदा रेड झोनमध्ये शेअर बाजाराची सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठे चढ-उतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 10:12 IST

Share Market Opening 13th December, 2024: शुक्रवारी शेअर बाजाराचं कामकाज पुन्हा एकदा घसरणीसह सुरू झालं. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी बीएसई सेन्सेक्स ७७.५१ अंकांच्या घसरणीसह ८१,२१२.४५ अंकांवर उघडला.

Share Market Opening 13th December, 2024: शुक्रवारी शेअर बाजाराचं कामकाज पुन्हा एकदा घसरणीसह सुरू झालं. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी बीएसई सेन्सेक्स ७७.५१ अंकांच्या घसरणीसह ८१,२१२.४५ अंकांवर उघडला. तर एनएसई निफ्टी ५०.३५ अंकांच्या घसरणीसह २४,४९८.३५ अंकांवर उघडला. गुरुवारीदेखील शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात घसरणीसह झाली होती. कामाकाजाच्या अखेरिसही बाजार रेड झोनमध्ये बंद झाला होता.

बहुतांश शेअर्स रेड झोनमध्ये

शुक्रवारी सेन्सेक्सच्या ३० पैकी २० कंपन्यांते शेअर्स घसरणीसह रेड झोनमध्ये उघडले आणि केवळ ९ कंपन्यांचे शेअर्स तेजीसह उघडले. तर एका कंपनीचा शेअर कोणताही बदल न होता उघडला. त्याचप्रमाणे निफ्टी ५० निर्देशांकातील ५० पैकी २९ कंपन्या घसरणीसह, १९ कंपन्यांचे शेअर्स तेजीसह ग्रीन झोनमध्ये आणि दोन कंपन्यांच्या शेअरमध्ये कोणतेही बदलझालेले नाही.

या शेअर्समध्ये तेजी

सेन्सेक्समधील पॉवरग्रिड या कंपनीचे शेअर्स सर्वाधिक ०.७३ टक्क्यांनी वधारले. भारती एअरटेल ०.४८ टक्के, अदानी पोर्ट्स ०.४७ टक्के, टाटा मोटर्स ०.१८ टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हर ०.१८ टक्के, नेस्ले इंडिया ०.१४ टक्के, एशियन पेंट्स ०.१२ टक्के, सन फार्मा ०.०७ टक्के आणि कोटक महिंद्रा बँक ०.०३ टक्क्यांनी वधारले. एनटीपीसीच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही.

या शेअर्समध्ये घसरण

दुसरीकडे जेएसडब्ल्यू स्टीलचा शेअर १.५७ टक्क्यांच्या घसरणीसह उघडला. टाटा स्टील १.१३ टक्के, अल्ट्राटेक सिमेंट ०.८४ टक्के, इन्फोसिस ०.७५ टक्के, टायटन ०.६९ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा ०.४९ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.४८ टक्के, टेक महिंद्रा ०.४८ टक्के, बजाज फायनान्स ०.४६ टक्के, आरआयएल ०.४५ टक्के, मारुती सुझुकी ०.३४ टक्के, इंडसइंड बँक ०.३० टक्के, टीसीएस ०.२४ टक्के, लार्सन अँड टुब्रो ०.२३ टक्के, लार्सन अँड टुब्रो ०.२३ टक्के, आयटीसी ०.२१ टक्के, अॅक्सिस बँक ०.१८ टक्के, एसबीआय ०.१२ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.०७ टक्के, एचडीएफसी बँक ०.०६ टक्के आणि एचसीएल टेक ०.०२ टक्क्यांनी घसरले.

टॅग्स :शेअर बाजार