Join us

Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 08:30 IST

Share Market Muhurat Trading Time: महाराष्ट्रात आज सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे शेअर बाजारात पूर्ण दिवस काम होणार नाही. बँका देखील बंद असतील.

मुंबई: दिवाळी झाली तरी आज देशातील शेअर बाजारासह बँका बंद असणार आहेत. मंगळवार, २१ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये सामान्य व्यवहार बंद राहणार आहेत. परंतू, लक्ष्मीपूजनामुळे आज एका तासासाठी शेअर बाजार सुरु ठेवला जाणार आहे. 

महाराष्ट्रात आज सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे शेअर बाजारात पूर्ण दिवस काम होणार नाही. परंतु, आज शेअर बाजार फक्त एका तासासाठी उघडणार असून, याला 'मुहूर्त ट्रेडिंग' असे म्हणतात. 

आज मुहूर्त ट्रेडिंगची अचूक वेळ काय?शेअर बाजारात दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर ही विशेष ट्रेडिंग केली जाते. पारंपारिकरित्या हा दिवस गुंतवणुकीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या वर्षी मुहूर्त ट्रेडिंगचा संपूर्ण एक तासाचा अवधी खालीलप्रमाणे असेल:

प्री-ओपनिंग विंडो : दुपारी १:३० ते दुपारी १:४५ पर्यंत

मुहूर्त ट्रेडिंगची वेळ : दुपारी १:४५ ते दुपारी २:४५ पर्यंत (१ तास)

या एका तासात गुंतवणूकदारांना शेअर खरेदी-विक्री करण्याची संधी मिळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Muhurat Trading: Stock market open for one hour only today!

Web Summary : Stock markets are closed today except for one hour of Muhurat trading due to Diwali's Lakshmi Pujan. NSE and BSE will remain closed for normal trading. The Muhurat trading window is from 1:45 PM to 2:45 PM, offering investors a limited opportunity for auspicious trading.
टॅग्स :शेअर बाजारदिवाळी २०२५