Join us

Share Market: एका महीन्यात पैसे डबल...या सरकारी बँकेच्या शेअरने दिले बंपर रिटर्न्स, तुमच्याकडे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 15:56 IST

Share Market: गेल्या सहा महिन्यात या बँकेने 207 टक्के रिटर्न्स दिले आहेत.

Share Market Return: जिथे निफ्टी बँके (Nifty Bank) ने गेल्या एका महीन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 4.72 टक्के रिटर्न्स दिले आहेत, तिथे सार्वजनिक क्षेत्रातील यूको बँके (Uco Bank Share Price)  ने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न्स दिले आहेत. फक्त एका महीन्यात या बँकिंग स्टॉक (Bank Stocks) ने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या काळात हा स्टॉक 14.80 रुपयांवरुन 34.50 रुपयांवर पोहोचला. 

तुम्ही यूको बँकेच्या शेअरची प्राइस हिस्ट्री पाहिली, तर गेल्या पाच दिवसात हा स्टॉक 48 टक्क्यांपेक्षा अधिक वर गेला आहे. आज हा 30.60 रुपयांवर सुरू झाला आणि आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी 34.50 रुपयांवर पोहोचला.

6 महीन्यात 1 लाखाचे झाले 3.07 लाख

गेल्या सहा महिन्यात यूको बँके ने 207 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न्स दिले आहेत. या काळात हा स्टॉक 11.05 रुपयावरुन 32.50 वर पोहचला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याच्या शेअरची किंमत 2 लाख 70 हजार झाली असती. 

स्टॉक वाढण्याचे कारणसप्टेंबर तिमाहीत बँकेची कामगिरी खूप चांगली होती. नेट इंटरेस्ट इनकम 10.76 टक्के वाढून 1769.60 कोटींवर पोहचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ही रक्कम 1597.72 कोटी होती.

(डिस्‍क्‍लेमर: आम्ही फक्त शेअरच्या कामगिरीची माहिती देत आहोत, कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार