Join us

गुंतवणूकीची सुवर्णसंधी! पुढील आठवड्यात येणार 5 नवीन IPO, जाणून घ्या माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 20:14 IST

Share Market IPO : पुढील आठवड्यात एथर एनर्जी लिमिटेडचा IPO देखील येत आहे.

Share Market IPO : काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत गेल्या अनेक महिन्यांपासून IPO मार्केटमध्येही शांतता पसरली आहे. पण, येत्या आठवड्यात पुन्हा एकदा आयपीओ मार्केटमध्ये बरीच हालचाल दिसून येणार आहे. बाजारात 5 नवीन आयपीओ दाखल होणार असून, त्यापैकी 1 मेनबोर्ड आणि उर्वरित 7 एसएमई क्षेत्रातील आहेत.

एथर एनर्जी लिमिटेडचा IPOएथर एनर्जीचा आयपीओ हा मेनबोर्ड आयपीओ असेल, जो सोमवार(28 एप्रिल) रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल, तर गुंतवणूकदार 30 एप्रिलपर्यंत त्यात बोली लावू शकतील. कंपनी तिच्या आयपीओद्वारे 2,981.06 कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. यामध्ये 2,626.30 कोटी रुपयांचा नवीन इश्यू आणि 351.76 कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल असेल. कंपनीने या आयपीओची किंमत 304-321 रुपये निश्चित केली असून, किमान गुंतवणूक 14,777 रुपये आहे.

MSME क्षेत्राचा आयपीओयेत्या आठवड्यात 4 आयपीओ एसएमई विभागातील असतील, ज्यामध्ये आयवेअर सप्लायचेन सर्व्हिसेस आयपीओ, केनरिक इंडस्ट्रीज आयपीओ, अरुणय ऑरगॅनिक्सचा आयपीओ आणि वॅगन्स लर्निंगचा आयपीओचा समावेश आहे. 

आयवेअर सप्लायचेन सर्व्हिसेसआयवेअर सप्लायचेन सर्व्हिसेस कंपनीचा इश्यू 27.13 कोटी रुपयांचा आहे. गुंतवणूकदार 28 एप्रिल ते 30 एप्रिल, या कालावधीत या आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकतील. या आयपीओची किंमत 95 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

केनरिक इंडस्ट्रीजगुंतवणूकदार केनरिक इंडस्ट्रीजच्या आयपीओमध्ये 29 एप्रिल ते 6 मे 2025 पर्यंत गुंतवणूक करू शकतील. कंपनी आयपीओद्वारे 8.75 कोटी रुपये उभारेल. या आयपीओची किंमत प्रति शेअर 25 रुपये निश्चित करण्यात आली असून, त्यात किमान गुंतवणूक 1 लाख 50 हजार रुपये आहे.

अरुणय ऑरगॅनिक्स अरुणय ऑरगॅनिक्सचा आयपीओ देखील पुढील आठवड्यात बाजारात येईल. या आयपीओद्वारे कंपनीचे 33.99 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट आहे. गुंतवणूकदार या आयपीओमध्ये 29 एप्रिल ते 2 मे पर्यंत गुंतवणूक करू शकतात. प्रति शेअर 5558 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

वॅगन्स लर्निंग वॅगन्स लर्निंग हा 38.38 कोटी रुपयांचा बुक-बिल्डिंग इश्यू आहे. गुंतवणूकदार या आयपीओमध्ये 2 मे ते 6 मे पर्यंत गुंतवणूक करू शकतात. त्याची किंमत78-82 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक